ETV Bharat / sitara

तापसी पन्नूचा ‘लूप लपेटा’मधील ‘फर्स्ट लूक’ आला बाहेर! - रन लोला रन’चा अधिकृत हिंदी रिमेक

अभिनेत्री तापसी पन्नू हटके भूमिका साकारण्यासाठी ती प्रसिद्ध आहे. सध्या पश्चिमात्य चित्रपट ‘रन लोला रन’चा अधिकृत हिंदी रिमेक बनतोय व अशा ‘आऊट ऑफ द बॉक्स’ चित्रपटासाठी तापसी पन्नूची निवड झाली नसती तर नवल वाटले असते. हा जर्मन चित्रपट १९९८ मध्ये रिलीज झाला होता ज्याचे दिग्दर्शन टॉम टायकर्वर यांनी केले होते.

Tapasi Pannu's 'First Look' from 'Loop Lapeta
तापसी पन्नू चा ‘लूप लपेटा’ मधील ‘फर्स्ट लूक
author img

By

Published : Feb 2, 2021, 7:44 PM IST

मुंबई - तापसी पन्नू भूमिका निवडीबाबत नेहमीच चोखंदळ राहिली आहे. हटके भूमिका साकारण्यासाठी ती प्रसिद्ध आहे. सध्या पश्चिमात्य चित्रपट ‘रन लोला रन’ चा अधिकृत हिंदी रिमेक बनतोय व अशा ‘आऊट ऑफ द बॉक्स’ चित्रपटासाठी तापसी पन्नूची निवड झाली नसती तर नवल वाटले असते. हा जर्मन चित्रपट १९९८ मध्ये रिलीज झाला होता ज्याचे दिग्दर्शन टॉम टायकर्वर यांनी केले होते व आतापर्यंत इंग्रजी व जपानी भाषेत दिसलाय.

‘रश्मी रॉकेट’ नंतर तापसी पन्नू ‘लूप लपेटा’ च्या चित्रीकरणात व्यस्त झालीय. नुकताच तिने तिचा ‘फर्स्ट लूक’ सर्वांसमोर आणला. एका जुनाट बाथरूममधील टॉयलेट सीटवर बसलेली, हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटांनी व्यापलेला फोटो असून, तापसीच्या चेहऱ्यावरचे लूक्स खंबीर दिसताहेत व ती कोणालातरी बोटांमध्ये धरलेल्या चिठ्ठीचा जाब विचारतेय असे वाटते.

तापसी सध्या गोव्यात असून ‘लूप लपेटा’ चे शेवटचे शेड्युल पूर्ण करतेय. जाहिरातक्षेत्रात मोठे नाव असलेले आकाश भाटिया या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत असून तापसीसोबत ताहीर राज भसीन प्रमुख भूमिकेत आहे. हा थ्रिलर-कॉमेडी चित्रपट असून आजच्या तरुणाईला आवडेल असे कथानक व संवाद चित्रपटात आहेत. तापसीच्या डोळ्यात भरणारा ट्रेंडी लूक पाहून सर्वांनी वाहवा केलीय.

‘लूप लपेटा’ ची निर्मिती सोनी पिक्चर्स फिल्म्स इंडिया, एलिसिस एंटरटेनमेंट च्या बॅनरखाली होत असून निर्माते तनुज गर्ग, अतुल कसबेकर आणि आयुष माहेश्वरी या चित्रपटाचे शूटिंग लवकरच संपवून तो याच वर्षी प्रदर्शित करण्याच्या प्रयत्नांत आहेत.

हेही वाचा - आरंभ : प्रभास, सैफ अलीच्या 'आदिपुरुष'च्या शुटिंगला सुरुवात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.