चेन्नई - सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या धमक्या मिळाल्यानंतर तमिळ अभिनेत्री विजया लक्ष्मीने रविवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्यावर सध्या चेन्नईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विजया लक्ष्मी हिने सोशल मीडियावर खुलासा केला की राजकारणात उतरलेला अभिनेता सीमन आणि त्याच्या पक्षाचे सदस्य तिच्यावर अत्याचार करीत आहेत आणि तिचा अपमान करीत आहेत. नाम थामिझर पक्षाचा नेता सीमन आणि हरी नादर यांच्या अनुयायांनीही मतभेदांमुळे तिला त्रास दिला, असा आरोप तिने केला.
रक्तदाब कमी होण्याच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करीत असल्याचा व्हिडिओ तिने फेसबुकवर रविवारी शेअर केला आहे.
"हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे आणि मी सीमन आणि त्याच्या कार्यकर्त्यांमुळे गेल्या चार महिन्यांत प्रचंड तणावात होते. माझ्या आई आणि बहिणीमुळे मी एवढे दिवस टिकून राहण्याचा प्रयत्न केला. पण मी माध्यमांमध्ये हरि नादर यांच्यामुळे अपमानित झाले आहे. मी बीपीच्या दोन गोळ्या आधीच घेतल्या आहेत. त्यामुळे काही काळात माझा रकत्दाब कमी होईल आणि काही तासांतच माझा मृत्यू होईल. हा व्हिडिओ पाहत असलेल्या चाहत्यांना सांगायचं आहे की माझा जन्म कर्नाटकात झाला आहे आणि सीमनने माझ्यावर खूप अत्याचार केले आहेत, " असे विजया लक्ष्मी व्हिडिओमध्ये म्हणाली. आपला छळ झाल्याचा दावा तिने या व्हिडिओतून केला आहे.
विजया लक्ष्मीने फ्रेंड्स या तमिळ चित्रपटातून पदार्पण केले होते.