मुंबई - तू जेव्हा थैलीत होता ना तेव्हा मी पहिलीत होते", "साडी बघायच्या वयात हा गाडी का बघतोय...." असे खटकेबाज संवाद असलेली आगळीवेगळी प्रेमकहाणी आता प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. 'स्वीटी सातारकर' असे या आगामी चित्रपटाचे नाव आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटात अमृता देशमुख, संग्राम समेळ, विजय निकम, गौरी जाधव, वंदना वाकनीस, पुष्कर लोणारकर, विनम्र भाबल, प्रशांत विचारे अशी दमदार स्टारकास्ट आहे. हलकीफुलकी कथा, उत्तम कलाकार, तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असलेला हा चित्रपट निश्चितपणे प्रेक्षकांची दाद मिळवणार असल्याचं या ट्रेलरवरून कळतं.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हेही वाचा -महाशिवरात्रीनिमित्त हृतिक रोशनने कुटुंबीयांसोबत घेतले महादेवाचे दर्शन
फ्रेश कलाकार आणि दमदार गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मुनाफ नाईक, संतोष साबळे यांनी निर्मिती केलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन शब्बीर नाईक यांनी केलं आहे. तर, ध्रुव दास, सतीश जांबे, रिया तेंडुलकर, सुधाकर ओमळे आणि स्वरूप स्टुडिओज हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.
सुमित गिरी यांनी चित्रपटाचं लेखन, संतोष मुळेकर यांनी संगीत दिग्दर्शन, फैसल महाडिक यांनी संकलन, मंगेश कांगणे आणि सुहास सावंत यांनी गीतलेखन केलं आहे.

हेही वाचा -'कामयाब' चित्रपटाच्या ट्रेलरवर अजय देवगने दिली प्रतिक्रिया, पाहा व्हिडिओ
खटकेबाज संवाद हे तर चित्रपटाचं वैशिष्ट्य ठरणार आहे. त्यामुळे ज्या तरुणावर स्वीटी सातारकर जीव ओवाळून टाकते, तिला तो मिळणार का, याचं उत्तर चित्रपट पाहिल्यावरच मिळेल. २८ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.