ETV Bharat / sitara

स्वप्नील जोशीच्या 'मोगरा फुलला'चे टायटल ट्रॅक प्रदर्शित - मोगरा फुलला

'मोगरा फुलला' या चित्रपटाच्या शिर्षकगीताचं संगीत रोहित राऊत यांने दिले आहे. तर, अभिषेक कणकरने हे गाणे लिहिले आहे.शंकर महादेवन यांच्या आवाजाची जादु या टायटल ट्रॅकमध्ये अनुभवायला मिळते.

स्वप्नील जोशीच्या 'मोगरा फुलला'चे टायटल ट्रॅक प्रदर्शित
author img

By

Published : May 20, 2019, 5:16 PM IST

मुंबई - मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय स्वप्नील जोशीचा लवकरच 'मोगरा फुलला' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे नुकतेच टायटल ट्रॅक प्रदर्शित झाले आहे. यापूर्वी या चित्रपटाचे 'मनमोहीनी' हे गाणे चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे. आता शंकर महादेवन यांच्या आवाजाची जादु या टायटल ट्रॅकमध्ये अनुभवायला मिळते.

'मोगरा फुलला' या चित्रपटाच्या शिर्षकगीताचं संगीत रोहित राऊत यांने दिले आहे. तर, अभिषेक कणकरने हे गाणे लिहिले आहे. स्वप्नील जोशीसह या चित्रपटात नीना कुलकर्णी, सई देवधर या अभिनेत्रीदेखील झळकणार आहेत. नायकाच्या मनाच्या विविध भावभावनांना या गाण्यातून स्पर्श केला आहे. स्वप्नीलने त्याच्या इन्स्टाग्रामवरही या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

Swapnil Joshi starer Mogara Phulala title track out
स्वप्नील जोशीच्या 'मोगरा फुलला'चे टायटल ट्रॅक प्रदर्शित

या चित्रपटात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी हे देखील स्वप्नील जोशीच्या काकाची भूमिका साकारत आहेत. येत्या १४ जूनला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होईल.

Intro:Body:

Ent 01

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.