ETV Bharat / sitara

मालदीवच्या समुद्रकिनारी सुष्मिता सेनचा रोमॅन्टिक अंदाज, शेअर केला व्हिडिओ - sushmita sen news

सुष्मिता तिच्या दोन्ही मुली आणि रोहमनसोबत मालदिव येथे गेली आहे. तिने तिथल्या समुद्रकिनाऱ्यावरचा एक व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर केला आहे.

मालदीवच्या समुद्रकिनारी सुष्मिता सेनचा रोमॅन्टिक अंदाज, शेअर केला व्हिडिओ
author img

By

Published : Sep 14, 2019, 7:28 PM IST

मुंबई - बॉलिवूडचे बरेच कलाकार मालदीव येथे सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसतात. सध्या अभिनेत्री सुष्मिता सेनही मालदीव येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिने तिथल्या समुद्रकिनाऱ्यावरचा एक व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिचा रोमॅन्टिक अंदाज पाहायला मिळतो.

सुष्मिता तिच्या दोन्ही मुली आणि रोहमनसोबत मालदिव येथे गेली आहे. ती तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. तिच्या आणि रोहमन शॉल यांच्या नात्याचीही चर्चा होत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या नात्याची कबुली फार पूर्वीच दिलेली आहे. तेव्हापासून दोघांचेही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

हेही वाचा-आयुष्मानवर बॉलिवूड कलाकारांच्या शुभेच्छांचा वर्षाव, 'अशा' दिल्या शुभेच्छा

सुष्मिताने तिचा मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावरचा फोटो शेअर करून लिहिलंय, 'आयुष्य जगण्याचा आनंद तेव्हाच मिळतो, जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने आयुष्य जगत असता.' तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काही दिवसांपासून तिने 'अंडर वॉटर डायव्हिंग'चाही व्हिडिओ शेअर केला होता. हा अनुभवही तिच्यासाठी खूप आनंददायक आणि खास असल्याचं तिनं एका पोस्टमध्ये म्हटलं होतं.

हेही वाचा-अॅक्शन टिझर : पाहा, श्वास रोखून धरणारी दृष्ये आणि जीव धोक्यात घालणारा पाठलाग

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.