ETV Bharat / sitara

जिवलग मैत्रीची झलक दाखवणारे 'छिछोरे', नवं पोस्टर प्रदर्शित - साहो

'छिछोरे' चित्रपटातून कॉलेजमधील धमाल मस्ती प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. आपल्या आयुष्यातले वेगवेगळ्या शैलीचे मित्र अगदी आपल्या कुटुंबाप्रमाणे आपल्यासोबत असतात. हिच मैत्री साजरी करण्यासाठी 'छिछोरे' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

जिवलग मैत्रीची झलक दाखवणारे 'छिछोरे', नवं पोस्टर प्रदर्शित
author img

By

Published : Aug 12, 2019, 12:33 PM IST

मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपुत आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असणाऱ्या 'छिछोरे' चित्रपटाचा ट्रेलर काहीच दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. 'दंगल' चित्रपटानंतर दिग्दर्शक नितेश तिवारी या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. कॉलेजमधील जिवलग मैत्रीवर आधारित या चित्रपटाचं कथानक आहे. नुकतंच या चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

'छिछोरे' चित्रपटातून कॉलेजमधील धमाल मस्ती प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. आपल्या आयुष्यातले वेगवेगळ्या शैलीचे मित्र अगदी आपल्या कुटुंबाप्रमाणे आपल्यासोबत असतात. हिच मैत्री साजरी करण्यासाठी 'छिछोरे' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

  • Sushant Singh Rajput and Shraddha Kapoor... New poster of #Chhichhore... Directed by Nitesh Tiwari... Produced by Sajid Nadiadwala... Fox Star Studios presentation... 6 Sept 2019 release. pic.twitter.com/yscAFAEhpT

    — taran adarsh (@taran_adarsh) August 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

चित्रपटाच्या नव्या पोस्टरमध्ये 'छिछोरे'ची संपूर्ण गँग पाहायला मिळते. कॉलेजवयीन आणि उतारवयातील दोन्हीही रूपं या पोस्टरमध्ये दिसतात. सुशांत सिंग राजपुत, श्रद्धा कपूर, वरुण शर्मा, ताहिर बसिन, तुषार पांडे नविन पोलीशेट्टी, सहर्ष कुमार शुक्ला, अशी या 'छिछोरे'ची गँग आहे.

सुरुवातीला हा चित्रपट ३० ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, याच दिवशी श्रद्धा कपूर आणि प्रभासची भूमिका असलेला 'साहो' चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यामुळे 'छिछोरे' आता ६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होईल.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.