मुंबई - आपल्या विनोदबुद्धीने सुनील ग्रोव्हर नेहमी आपल्या चाहत्यांना खळखळून हसवतो. नेहमी तो आपल्या कॉमेडी अंदाजाने काही ना काही धमाल करत असतो. अलिकडेच ट्रेण्ड होत असलेले 'बॉटल कप चॅलेंज' सुनीलनेही स्वीकारले. मात्र, नेहमीप्रमाणे त्याने या चॅलेंजलाही कॉमेडीचा तडका लावला आहे.
ग्रोव्हरने हे चॅलेंज तर पूर्ण केले, पण आपल्या नेहमीच्याच कॉमेडी अंदाजात त्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याने शेअर केलेला व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल्याशिवाय राहणार नाही.
सुनीलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बॉटलचे झाकण उघडण्याचा सर्वात सोपा पर्याय सांगितला आहे. त्याने हातानेच झाकण उघडुन या व्हिडिओवर मजेदार कॅप्शनही दिले आहे. 'मुझसे तो हात सें ही खुल गया', असे त्याने म्हटले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
काय आहे बॉटल कॅप चॅलेंज
या चॅलेंजमध्ये पाण्याच्या अथवा कोणत्याही बटलीचे झाकण आपल्या किकने उघडायचे असते. ते ही बाटली खाली न पडू देता. आत्तापर्यंत बऱ्याच बॉलिवूड कलाकारांनी हे चॅलेंज यशस्वीपणे पार पाडले आहे. तर, काहींनी मात्र, मजेशीर व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, सुष्मिता सेन, रोहमन शॉल, यांनी हे चॅलेन्ज पूर्ण करून चाहत्यांना अचंबित केले आहे.