मुंबई - कला आणि क्रिकेट विश्वातील काही जोड्यांच्या लिंकअपच्या चर्चा नेहमीच पाहायला मिळतात. बऱ्याच दिवसापासून भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ओपनर केएल राहुल अभिनेत्री आणि सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. थायलंड येथे दोघांनीही एकत्र येऊन नववर्षाचे स्वागत केले. त्यांच्या या नात्यावर सुनील शेट्टी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
सुनीलने त्यांच्या नात्याविषयी एका माध्यमाशी बोलताना सांगितले, की 'मी माझ्या मुलांवर प्रेम करतो आणि ते ज्यांना डेट करतात त्यांच्यावरही प्रेम करतो. आपली मुलं त्यांच्या आयुष्यात नेहमी आनंदी असावी, यातच आपलेही सुख असते'.
हेही वाचा -वरुण धवनने शेअर केले स्ट्रीट डान्सर गाण्याचे नवे पोस्टर
यापूर्वी ते म्हणाले होते, की 'अहान आणि अथिया ज्यांना डेट करतात तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. यामध्ये आम्हाला कोणतीही समस्या नाही. ते आनंदी आहेत'.यावरून अथिया आणि केएल राहुल यांच्या नात्याला सुनील शेट्टी यांचीही परवानगी आहे, यात शंका नाही.
अलिकडेच अथिया आणि केएल राहुल यांना मुंबई विमानतळावर एकत्र स्पॉट करण्यात आले. राहुलने एक फोटो देखील शेअर केला आहे. त्यांच्या फोटोवर क्रिकेट आणि कला विश्वातील बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया मिळत आहेत.
हेही वाचा -'भुज : द प्राईड ऑफ इंडिया'त स्क्वाड्रन लिडर बनला अजय देवगण, फर्स्ट लूक प्रसिध्द