मुंबई - मराठी सिनेसृष्टीत आजवर खेळावर आधारित बऱ्याच चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, हिंदी सिनेसृष्टीचे आघाडीचे निर्माते सुभाष घई यांनी पहिल्यांदाच मराठीमध्ये खेळावर आधारित 'विजेता' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात सुबोध भावेची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी सुबोधने या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाची प्रेक्षकांना आतुरता होती. आता ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर ही उत्सुकता आणखी वाढली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हेही वाचा -अमृता खानविलकरचा चित्तथरारक स्टंट, व्हिडिओ पाहून आई थक्क
प्रत्येक खेळाडूला फक्त जिंकण्यासाठी तयार करण्याची सुबोधची जिद्द या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. तर, आपल्याच संघामध्ये एकमेकांना हरवण्यासाठी चढाओढही पाहायला मिळते. या सर्वांमध्ये कोण बाजी मारतं, महाराष्ट्र संघातील प्रत्येक खेळाडू विजेता बनेल का?, हे आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच समजेल. चित्रपटातील संवाद या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य आहे. ट्रेलरमध्येही काही संवाद चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवतात.
या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे हा मध्यवर्ती भूमिकेत आहे. तर, अभिनेत्री पूजा सावंत देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता सुशांत शेलार हा खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळेल. या तिघांशिवाय माधव देवचके, मानसी कुलकर्णी, देवेन्द्र चौगुले, तन्वी किशोर, कृतिका तुळसकर, प्रीतम कांगणे, दिप्ती धोत्रे, गौरीश शिपूरकर, ललित सावंत हे या चित्रपटात काम करताना दिसतील.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -'भय आणि भीतीच्या कोड्याचा लपंडाव', पाहा 'भयभीत'चा थरारक टीझर
या सिनेमाचं लेखनही स्वतः अमोल शेडगे यांनीच केलं आहे. निर्माते राहुल पुरी, सहनिर्माते सुरेश पै असतील. तर आघाडीचे संगीतकार रोहन हे या सिनेमाला संगीत देणार आहेत. १२ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटाचं दिग्दर्शन अमोल शेडगे यांनी केले आहे.