मुंबई - दिल्लीतील निर्भयावरील लैंगिक अत्याचार व तिची अमानुष हत्येची आठवण करून देणाऱ्या घटना एकापाठोपाठ घडत आहेत. अलिकडेच हैदराबाद येथे घडलेले लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरण हे भयंकर आहे. महिला पशुवैद्यकीय डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आली. यामुळे देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. देशाला हादरवून सोडणाऱ्या या घटनेवर सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कलाविश्वातूनही बऱ्याच कलाकारांनी या घटनेचा निषेध केला. अभिनेता सुबोध भावेनेही ट्विट करून या घटनेबद्दल संताप व्यक्त केला.
-
ज्या छोट्याश्या अवयवाच्या जोरावर यांना माज आलाय तो अवयव शरीरापासून वेगळा करूनच त्यांना शिक्षा जाहीर केली पाहिजे.
— सुबोध भावे (@subodhbhave) November 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
डॉ.प्रियांका यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
जो देश स्त्रियांचा सन्मान ठेऊ शकत नाही तो स्वतःचा सत्व गमावतो.#enoughisenough
">ज्या छोट्याश्या अवयवाच्या जोरावर यांना माज आलाय तो अवयव शरीरापासून वेगळा करूनच त्यांना शिक्षा जाहीर केली पाहिजे.
— सुबोध भावे (@subodhbhave) November 30, 2019
डॉ.प्रियांका यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
जो देश स्त्रियांचा सन्मान ठेऊ शकत नाही तो स्वतःचा सत्व गमावतो.#enoughisenoughज्या छोट्याश्या अवयवाच्या जोरावर यांना माज आलाय तो अवयव शरीरापासून वेगळा करूनच त्यांना शिक्षा जाहीर केली पाहिजे.
— सुबोध भावे (@subodhbhave) November 30, 2019
डॉ.प्रियांका यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
जो देश स्त्रियांचा सन्मान ठेऊ शकत नाही तो स्वतःचा सत्व गमावतो.#enoughisenough
हेही वाचा -पशुवैद्यकीय डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरण; शादनगर पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांचे आंदोलन
बुधवारी रात्री रुग्णालयातून घरी जात असताना महिला पशुवैद्यकीय डॉक्टरच्या गाडीचा टायर पंक्चर झाल्यामुळे त्या महामार्गावरील टोल प्लाझाजवळ थांबल्या होत्या. तेव्हा ४ आरोपींनी त्या तरुणीवर लैंगिक अत्याचार करून त्यांचा खून केला होता. तसेच त्यांचा मृतदेह जाळला होता. शेवटी तरुणीचे तिच्या बहिणीशी बोलणे झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या बहिणीने संबधित तरुणीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, फोन बंद असल्याचे समजले. त्यानंतर दिवसभर शोधाशोध केल्यानंतर बहिणीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपींना अटक केली आहे.
हेही वाचा -बलात्काराच्या घटनांनी नेटिझन्स संतप्त; ट्विटरवर 'निर्भया' ट्रेण्डिंग