मुंबई - बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने सफाई कामगारांचा एक व्हिडिओ शेअर करून त्यांचे आभार मानले आहेत. 'बीएमसी'च्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओत मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी सफाई कामगार कशी मेहनत घेतात, हे दाखवण्यात आले आहे.
-
Thank you for all the hard work to keep our city clean, Mamas and Papas. Love the film... https://t.co/80uJk4HWcW
— Shah Rukh Khan (@iamsrk) December 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Thank you for all the hard work to keep our city clean, Mamas and Papas. Love the film... https://t.co/80uJk4HWcW
— Shah Rukh Khan (@iamsrk) December 27, 2019Thank you for all the hard work to keep our city clean, Mamas and Papas. Love the film... https://t.co/80uJk4HWcW
— Shah Rukh Khan (@iamsrk) December 27, 2019
'माझी मुंबई, आपली बीएमसी' या ट्विटर हँडलवर सफाई कामगारांचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एका लहान मुलीचा आवाज ऐकायला मिळतो. मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी तिच्या वडिलांप्रमाणे तब्बल ४६००० स्वच्छतादूत कशी मेहनत घेतात, हे दाखवण्यात आले आहे.
हेही वाचा -'सिंघम', 'सिंबा', 'सूर्यवंशी'ची खास झलक, प्रदर्शनाची तारीख जाहीर
आपल्याला निरोगी राहता यावे, यासाठी ते मेहनत घेत असतात. त्यामुळे शाहरुख खानने त्यांचे आभार मानले आहेत.
हेही वाचा -'दबंग ३' VS 'गुड न्यूज', अक्षय कुमारच्या चित्रपटांबाबत काय म्हणाला सलमान खान