मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानला १० व्या मेलबर्न इंडियन फिल्म फेस्टीव्हलमध्ये 'एक्सलन्स इन सिनेमा' अॅवार्ड देण्यात येणार आहे. ८ ऑगस्टला हा पुरस्कार देण्यात येईल. व्हिक्टोरियाच्या राज्यपाल लिंडा डेसाऊ यांच्या हस्ते हा पुरस्कार पलास थिएटरमध्ये प्रदान करण्यात येईल. भारतीय सिनेमा आणि लोकप्रिय संस्कृतीमध्ये निरंतर योगदान दिल्याबद्दल शाहरुख खानला हा पुरस्कार दिला जाणार आहे.
शाहरुख म्हणाला, "भारतातील अनेक विभागातून मेलबर्नला आलेल्या माझ्या इंडस्ट्रीतील लोकांसमोर आणि मंचावर मी पोडियम शेअर करेन, हा माझ्यासाठी शानदार अनुभव असेल."
तो पुढे म्हणाला, "मी लिंडा डेसाऊ यांना भेटण्यासाठी फार उत्सुक आहे. आयएफएफएमच्या वतीने सजवण्यात आलेल्या या फेस्टीव्हलच्या सुंदर संध्याकाळी ९० च्या दशकानंतर 'दिवाना', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' यासारख्या चित्रपटांसह लोकांचे मनोरंजन केले जाईल."
या फेस्टीव्हालचे डायरेक्टर मितु भौमिक म्हणाले, "हिंदी सिनेमाच्या पायोनियरचा विचार केला जातो तेव्हा शाहरुख खानचे नाव येते. जगभरातील लाखो लोकांवर प्रभाव टाकणाऱ्या शाहरुखने हिंदी सिनेमामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे."