ETV Bharat / sitara

'स्टूडंट ऑफ द ईअर-२'च्या कलकारांचा लूक रिलीज, ट्रेलर उद्या येणार प्रेक्षकांच्या भेटीला - karan johar

या चित्रपटाचे टीझर पोस्टर अलिकडेच प्रदर्शित करण्यात आले होते. या पोस्टमध्ये कलाकारांचे लूक पाहायला मिळत नाहीत. मात्र, आता या चित्रपटातील कलाकारांचे लूकही प्रदर्शित करण्यात आले आहेत. उद्या म्हणजेच १२ एप्रिलला या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

'स्टूडंट ऑफ द ईअर-२'च्या कलकारांचा लूक रिलीज
author img

By

Published : Apr 11, 2019, 8:05 PM IST

मुंबई - मागील बऱ्याच काळापासून 'स्टूडंट ऑफ द ईअर-२' या चित्रपटाची चर्चा सुरु होती. २०१४ साली आलेल्या 'स्टूडंट ऑफ द ईअर' या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यवर घेतले होते. या चित्रपटातून वरूण धवन, आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा या कलाकारांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर आता चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच 'स्टूडंट ऑफ द इअर-२' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
विशेष म्हणजे या चित्रपटातूनही दोन नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि अनन्या पांडे या कलाकारांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. तारा सुतारीया आणि अनन्या पांडे या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करत आहेत.

या चित्रपटाचे टीझर पोस्टर अलिकडेच प्रदर्शित करण्यात आले होते. या पोस्टमध्ये कलाकारांचे लूक पाहायला मिळत नाहीत. मात्र, आता या चित्रपटातील कलाकारांचे लूकही प्रदर्शित करण्यात आले आहेत. उद्या म्हणजेच १२ एप्रिलला या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

दिग्दर्शक पुनित मल्होत्रा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर हिरू जोहर आणि करण जोहर यांची निर्मिती आहे. मे महिन्यात १० तारखेला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Intro:Body:

Ent 2

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.