मुंबई - लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सोनू सूद अनेक लोकांची मदत करत होता. आता अनलॉकनंतरही त्याने आपला मदतीचा ओघ सुरूच ठेवला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सोनू सूदच्या एका चाहत्याने असे काम केले की त्यामुळे सोनू खूप नाराज झालाय. एका चाहत्याने सोनूला टॅग करुन मदतीची अपेक्षा केली होती आणि त्याच्यासोबतचे दोन फोटोही शेअर केले होते. त्याने आपल्या हातावर रक्ताने सोनू असे लिहिले आहे आणि हातावर रक्तही सांडलेले दिसते. त्याला उत्तर देताना सोनूने लिहिलंय, ''मी तुम्हाला विनंती करतो की असे काही करु नका. माझे ह्रदय तुटते. तुमचे प्रेम मी समजू शकतो. दररोज मिळत असेल्या मेसेजेसमधून त्याचा अनुभवही घेतोय. परंतु अशा प्रकारची गोष्ट मला दुःखी करते. प्लिज असे काही करु नका. मी तुम्हाला कोणत्याही वेळी भेटेन. परंतु असे पुन्हा करु नका प्लिज.''
हेही वाचा - सुशांत सिंहच्या अस्थींचे शोकाकूल वातावरणात झाले गंगेमध्ये विसर्जन...
सुशांत सिंह राजपूतच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सोनूनेही सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे. सोशल मीडियावर त्याने लिहिलंय, ''धक्का...ह्रदय तुटले..भाऊ...माझ्याजवळ शब्द नाहीत. ही बातमी खरी नसती तर बरे झाले असते.''
सुशांतने वांद्रे येथील त्याच्या घरात पंख्याला लटकवून स्वतःचे जीवन संपवले होते. त्यानंतर अनेक बॉलिवूडकरांनी त्याला श्रद्धांजली वाहिली होती.