मुंबई - बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणेच एका चिमुकलीच्या गायनाची झलक तिच्या बालपणीच पाहायला मिळत आहे. तिच्या बोबड्या गाण्याची भूरळ सोनू निगमलाही पडली आहे. तिचं गाणं ऐकुन सोनु निगमने तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ही चिमुकली चक्क लता मंगेशकरांचं 'लग जा गले' हे अवघड गाणं गाताना दिसत आहे.
या चिमुकलीचं कौतुक करताना सोनुने लिहिलेय, जरा या चिमुरडीला पाहा.... संगीत क्षेत्रात ती मोलाचं योगदान देणार आहे. ही खरंच दैवी देणगी आहे. शिवाय कलाकार हा मुळात घडलेला असतो. इथे फक्त त्याला पैलू पाडण्याची गरज असते, असं म्हणत एका खऱ्या कलाकाराविषयी सोनूने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या चिमुकलीच्या व्हिडिओवर आत्तापर्यंत लाखो व्हिव्ज मिळाले आहेत.