ETV Bharat / sitara

अनु मलिकवर पुन्हा भडकली सोना मोहापात्रा, #MeeToo मोहिमेद्वारे केला होता हल्लाबोल - श्वेता पंडित

काही महिन्यांपूर्वी #MeeToo मोहिमेद्वारे कलाविश्वातील बऱ्याच दिग्गजांची नावे धक्कादायकरित्या समोर आली होती. यापैकीच एक नाव म्हणजे अनु मलिक. सोना मोहापात्राने त्यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप लावले होते.

अनु मलिकवर पुन्हा भडकली सोना मोहापात्रा, #MeeToo मोहिमेद्वारे केला होता हल्लाबोल
author img

By

Published : Aug 1, 2019, 10:48 PM IST

मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका सोना मोहापात्रा पुन्हा एकदा एका ट्विटमुळे चर्चेत आली आहे. #MeeToo मोहिमेद्वारे तिने प्रसिद्ध गायक अनु मलिक यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप लावले होते. त्यामुळे अनु मलिक यांना बऱ्याच कार्यक्रमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. आता पुन्हा एकदा अनु मलिक एका कार्यक्रमामुळे सज्ज झाले आहेत. त्यामुळे सोनाने पुन्हा त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

काही महिन्यांपूर्वी #MeeToo मोहिमेद्वारे कलाविश्वातील बऱ्याच दिग्गजांची नावे धक्कादायक रित्या समोर आली होती. यापैकीच एक नाव म्हणजे अनु मलिक. सोना मोहापात्राने त्यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप लावले होते.

अनु मलिक आता पुन्हा एकदा पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाले आहेत. 'मला विनाकारण माझ्या कामापासून दुर व्हावे लागले', अशी प्रतिक्रिया त्यांनी या सर्व प्रकरणावर दिली होती. त्यांच्या याच प्रतिक्रियेवर सोनाने सडेतोड उत्तर दिले आहे.

अनु मलिक यांच्यावर सोनासोबत श्वेता पंडित हिनेही आरोप लावले होते. त्यामुळे अनु मलिक यांना इंडियन आयडॉल या कार्यक्रमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.