मुंबईः अभिनेत्री करिना कपूर खान हिने दुसऱ्यांदा गर्भवती असल्याची बातमी दिल्यानंतर तिची नंणंद सोहा अली खानने एक खास संदेश शेअर केला आहे. सोहाने इन्स्टाग्रामवर आपला भाऊ सैफ अली खानचा फोटो पोस्ट करीत कॅप्शनमध्ये लिहिले, "द क्वाडफादर". सैफ अली हा चौथ्यांदा बाप असल्याचा संदर्भ देऊन तिने हे कॅप्शन दिले होते.
सैफ अलीला अमृता सिंगसोबत विवाह केल्यानंतर सारा आणि इब्राहिम ही दोन अपत्ये आहेत. तर करिनासोबत तैमुर हा मुलगा आहे. करिना गर्भवती असल्यामुळे त्यांच्या घरी आता चौथे अपत्य येणार आहे.
करिना कपूरला सुरक्षित आणि निरोगी राहण्यासाठी आणि दोघांचेही अभिनंदन करण्यासाठी सोह अलीने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट तिने पोस्टमध्ये करीनाला टॅग केली आहे.
हेही वाचा - निशिकांत कामत यांची प्रकृती "स्थिर पण गंभीर"
यापूर्वी करिना आणि सैफने आपल्या घरी आणखी एका छोट्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे जाहीर केले होते.
सैफ आणि करिना यांचा विवाह २०१२ मध्ये झाला होता. तैमुर हा तीन वर्षाचा मुलगा त्यांना आहे. आत्ता आणखी एक मुल होणार असल्यामुळे दोघेही आनंदात आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">