ETV Bharat / sitara

स्मृती इराणी यांनी कविता लिहून गीतकार गुलजार यांचे व्यक्त केले आभार

author img

By

Published : May 6, 2020, 7:37 PM IST

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी गीतकार गुलजार यांच्यासाठी एक सुंदर कविता लिहिली आहे. असे अनेक लोक आहेत, जे आपल्याला नकळत प्रभावित करीत असतात. त्यांच्या कार्याने लाखो लोकांना प्रेरणा मिळते, असे त्यांनी गुलजार यांच्याबद्दल लिहिले आहे. लॉकडाऊनच्या काळात आपल्या अद्भूत कामाने जीवन आनंदी बनवल्याबद्दल गुलजार यांचे त्यांनी आभार मानले आहेत.

SMRITI-IRANI-PAYS-POETIC-TRIBUTE-TO-GULZAR-
समृती इराणी

मुंबई - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी कविता लिहून गीतकार गुलजार यांचे आभार मानले आहेत. लॉकडाऊनच्या काळात आपल्या अद्भूत कामाने जीवन आनंदी बनवल्याबद्दल गुलजार यांचे त्यांनी आभार मानले आहेत.

समृती इराणी यांनी आपल्या सोशल मीडियावर गीतकार गुलजार यांच्यासाठी एक कविता लिहिली आहे. प्रत्येकाचे आयुष्य कवितेतून गुलजार बनवल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. स्मृती इराणी या पूर्वाश्रमीच्या अभिनेत्री आहेत. त्यांनी गुलजार यांच्या 'चप्पा चप्पा चरखा चले' आणि 'छय्यां छय्यां 'या गाण्यांचे बोल आपल्या कवितेत वापरले आहेत.

त्यांनी लिहिलेली हिंदी कविता अशी आहे,

जिनकी वजह से जिंदगी गुलज़ार है, आज उनसे बात हुई. असे म्हणत त्यांनी पुढे लिहिलंय, ‘जिनकी कलम से गिलहरी के झूठे मटर का स्वाद आ जाए मुंह में, जिन्होंने चप्पे-चप्पे में चरखा चलवाया शब्दों का, जिनकी एक लकीर पर बड़े से बड़ा सितारा छैयां-छैयां करता हुआ रेल की रफ्तार की तरह दिल से दिल को छू जाए. उनको सलाम....क्योंकि उनकी कलम से कोरोना में भी जिंदगी कहीं ना कहीं गुलज़ार है.’

स्मृती इराणी यांनी कवितेच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''आपल्या आयुष्यात असे अनेक लोक आहेत, जे आपल्याला नकळत प्रभावित करीत असतात. त्यांच्या कार्याने लाखो लोकांना प्रेरणा मिळते. मी अशाच एका व्यक्तीला विचारले, 'सर सर्वकाही ठिक आहे ना ?' मला अनेक वर्षांपासून त्यांच्या कलाकृतीकडून प्रेरित होण्याचे सौभाग्य मिळाले आहे. जे लोक कोरानापासून वाचण्यासाठी आमची मदत करीत आहेत त्यांचे मी आभार मानते.''

गीतकार गुलजार हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते कवी आहेत. त्यांनी 'दिल से', 'साथिया,' 'मासूम', अशा असंख्य चित्रपटांची गीते लिहिली आहेत.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.