ETV Bharat / sitara

सिद्धांत आणि ईशान कॅटरिनाला विनवताहेत, ‘आमच्यासोबत ‘वर्कआउट’ करायला ये ना’! - कॅटरिना कैफ प्रमुख भूमिकांत

सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर ‘फोन भूत’ मध्ये एकत्र काम करताहेत व दोघे एकत्र वर्कआउट करतानाचा व्हिडीओ समाज माध्यमावर पोस्ट केला असून त्यात कॅटरिनाला वर्कआऊटसाठी आमंत्रित करताना दिसले आहेत. कॅटरिनानेही याला स्पोर्टिंगली घेतले आहे.

Siddhant and Ishaan
सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान
author img

By

Published : Feb 2, 2021, 7:25 PM IST

मुंबई - हल्ली कलाकारांना शारीरिक तंदुरुस्तीवर भरपूर मेहनत घ्यावी लागते. जवळपास प्रत्येक अभिनेता आपली शरीरयष्टी पिळदार बनविण्यासाठी धडपडत असतो. एक्सेल एंटरटेनमेंटच्या ‘फोन भूत’ मध्ये दोन जवान कलाकार असून दोघेही ‘वर्कआउट’ च्या माध्यमातून ‘बॉण्डिंग’ करताना दिसताहेत. त्यांच्या नावाचे हॅशटॅग #सिद्धशान सुद्धा ट्रेंड होतोय.

सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर ‘फोन भूत’ मध्ये एकत्र काम करताहेत व दोघे एकत्र वर्कआउट करतानाचा व्हिडीओ समाज माध्यमावर पोस्ट केला व त्यांची सहकलाकार कॅटरीना कैफला विनंती केली की, ‘आमच्यासोबत ‘वर्कआउट’ करायला ये ना’!

Siddhant and Ishaan plead with Katrina
सिद्धांत आणि ईशान कतरिनाला विनंती

कॅटरीनानेही ते स्पोर्टिंगली घेतलं आणि गंमतीत लिहिलं, ‘तुम्ही ‘बॉईझ’नी आज माझ्यापेक्षाही जास्त शूटिंग केलेलं दिसतंय...’, व सिद्धांतसोबत ईशानच्या व्हिडिओ-संकलन-कौशल्याची स्तुतीही केली. ‘फोन भूत’चं शूट उदयपूरला सुरु असून फावल्या वेळात सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर अशी वेगवेगळी धमालमस्ती करतंच असतात. यामुळे त्यांच्या चाहत्यांच्या उत्साहामध्ये भर पडत असते.

इशान आणि सिध्दांत वर्कआऊट करतानाचा मजेशीर व्हिडिओ

हेही वाचा - अनुभव सिन्हांच्या 'अनेक'मधील आयुष्मानचा लूक

‘फोन भूत’ चे दिग्दर्शन गुरमीत सिंग हे करत असून सिद्धांत चतुर्वेदी, ईशान खट्टर आणि कॅटरिना कैफ प्रमुख भूमिकांत आहेत. याचे कथानक रवी शंकरन आणि जसविंदरसिंग बाथ यांनी लिहिले असून फरहान अख्तर आणि रितेश सिधवानीच्या एक्सेल एंटरटेनमेंटची ही निर्मिती आहे.

हेही वाचा - आरंभ : प्रभास, सैफ अलीच्या 'आदिपुरुष'च्या शुटिंगला सुरुवात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.