ETV Bharat / sitara

'शुरू करें क्या', 'आर्टिकल १५' च्या गाण्याचा टीजर प्रदर्शित - rap song

आयुष्मानचे हे गाणे एक अँग्री रॅप असणार आहे. 'शुरू करें क्या', असे या रॅपचे बोल आहेत. समाजात बदल घडवण्यासाठी पाऊल उचलणं गरजेचं आहे, अशा आशयाचं हे रॅप आहे.

'शुरू करें क्या', 'आर्टिकल १५' च्या गाण्याचा टीजर प्रदर्शित
author img

By

Published : Jun 8, 2019, 2:00 PM IST

मुंबई - आयुष्मान खुरानाचा 'आर्टिकल १५' हा चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. काहीदिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांचा भेटीला आला. समाजातील गंभीर अशा विषयावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात आयुष्मान पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील पहिलं गाणं लवकरच प्रदर्शित होणार आहे. या गाण्याचा टीजर नुकताच रिलीज करण्यात आलाय.

आयुष्मानचे हे गाणे एक अँग्री रॅप असणार आहे. 'शुरू करें क्या', असे या रॅपचे बोल आहेत. समाजात बदल घडवण्यासाठी पाऊल उचलणं गरजेचं आहे, अशा आशयाचं हे रॅप आहे. त्यासाठी आयुष्मानच्या 'आर्टिकल १५' या चित्रपटाची टीम सज्ज झाली आहे. आयुष्माननेही सोशल मीडियावर या गाण्याचा टीजर शेअर केला आहे. 'बदल घडवायचा असेल, तर काम सुरू करायचे का?', असे कॅप्शन त्याने दिले आहे. १० जूनला हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

एका धक्कादायक सत्य घटनेवर 'आर्टिकल १५' चित्रपटाची कथा असणार आहे. येत्या २८ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनुभव सिन्हा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.