ETV Bharat / sitara

श्रुती हासनच्या वाढदिवसानिमित्त प्रसिध्द झाला 'सलार' चित्रपटातील फर्स्ट लूक - श्रुती हासनच्या सलारचे पोस्टर

अभिनेत्री श्रुती हासनच्या वाढदिवसानिमित्त सलार चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक प्रसिध्द केला आहे. अभिनेता प्रभास सहकलाकार असलेल्या या चित्रपटात श्रुती हासन आद्याची मुख्य भूमिका साकारणार असल्याचे पोस्टरवरून स्पष्ट झाले आहे.

श्रुती हासन
श्रुती हासन
author img

By

Published : Jan 28, 2022, 1:54 PM IST

मुंबई - अभिनेत्री श्रुती हासन 'सलार' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. आज श्रुतीचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त सलार चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक प्रसिध्द केला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी आपल्या ट्विटरवरुन चित्रपटातील श्रुतीचा फर्स्ट लुक पोस्टर शेअर केले.

अभिनेता प्रभास सहकलाकार असलेल्या या चित्रपटात श्रुती हासन आद्याची मुख्य भूमिका साकारणार असल्याचे पोस्टरवरून स्पष्ट झाले आहे.

'सलार' चित्रपटातील फर्स्ट लूक
'सलार' चित्रपटातील फर्स्ट लूक

KGF Chapter 1 आणि KGF Chapter 2 या चित्रपटाच्या निर्मात्या आणि दिग्दर्शकाकडून सलार या आणखी एक मनोरंजनक चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. सुपरस्टार प्रभास आणि श्रुती यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट होंबळे फिल्म्स निर्मित अॅक्शन व साहसी चित्रपट आहे. या चित्रपटात साऊथ स्टार जगपती बाबूही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

KGF चित्रपटाच्या मालिकेनंतर दिग्दर्शक प्रशांत नील आणि होंबळे फिल्म्स यांच्यातील हा तिसरा एकत्रीत चित्रपट असेल. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

दरम्यान, श्रुती यावर्षी तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा एक भाग म्हणून मानसिक आरोग्य, चित्रपट आणि माध्यमांमधील महिला आणि फॅशन या विषयांवर थेट इन्स्टाग्रामवर सेशन आयोजित करणार आहे.

हेही वाचा - आलिया भट्ट संजय भन्साळी यांचा 'गंगुबाई काठियावाडी' या तारखेला होणार रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.