मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज ३२ वा वाढदिवस. बॉलिवूड आशिकी गर्लच्या वाढदिवशी जाणून घेऊ तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी. श्रद्धा कपूरला बॉलिवूडमध्ये खरी ओळख मिळाली ती आशिकी २ या चित्रपटामुळे. या चित्रपटात तिने आदित्य रॉय कपूरसोबत स्क्रीन शेअर होती. मात्र, अनेकांना हे माहिती नाही, की आशिकी २ हा श्रद्धाचा पहिला चित्रपट नाही.
खरं तर श्रद्धाने २०१० सालीच तीन पत्ती चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हा एक थ्रिलर चित्रपट असून अमिताभ बच्चन आणि आर. माधवन यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या. तर श्रद्धा यात साईड रोलमध्ये होती. त्यामुळे, तीन पत्ती हा श्रद्धाचा पहिला चित्रपट असला तरीही मुख्य अभिनेत्री म्हणून आशिकी २ हाच तिचा पहिला चित्रपट ठरला.
‘आशिकी २’, ‘हैदर’, ‘एक विलन’,‘एबीसीडी २’, ‘रॉक ऑन २’, ‘ओके जानू’, ‘बागी’ 'हाफ गर्लफ्रेंड', 'स्त्री' यासारख्या सिनेमात श्रद्धाने आतापर्यंत भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय श्रद्धा लवकरच 'स्ट्रीट डान्सर' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात ती वरूण धवनसोबत स्क्रीन शेअर करणार असून हा चित्रपट डान्सवर आधारित असणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. याशिवाय लवकरच ती 'साहो', 'छिछोरे' आणि सायना नेहवालच्या बायोपिकमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
