ETV Bharat / sitara

श्रद्धा-प्रभासची रोमॅन्टिक केमेस्ट्री, साहोचं 'इन्नी सोनी' गाणं प्रदर्शित - महेश मांजरेकर

हे गाणं हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्ल्याळम अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित झाले आहे. प्रभासनेही या गाण्याचे विविध भाषेतील पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

श्रद्धा - प्रभासची रोमॅन्टिक केमेस्ट्री, साहोचं 'इन्नी सोनी' गाणं प्रदर्शित
author img

By

Published : Aug 2, 2019, 8:49 PM IST

मुंबई - 'बाहुबली' फेम प्रभास आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांची जोडी 'साहो' चित्रपटात झळकणार आहे. जबरदस्त अॅक्शन, स्टंट आणि बिग बजेट असलेल्या या चित्रपटाचे आतापर्यंत प्रदर्शित झालेले टीझर प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले. आता या चित्रपटातील प्रभास आणि श्रद्धाची लव्ह केमेस्ट्री असलेलं 'इन्नी सोनी' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

या गाण्याला पंजाबी गायक गुरू रंधावा आणि तुलसी कुमार यांनी आवाज दिला आहे. हे गाणं हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्ल्याळम अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित झाले आहे. प्रभासनेही या गाण्याचे विविध भाषेतील पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

याआधी चित्रपटातील 'सायको सय्या' गाणं प्रदर्शित झालं होतं. 'इन्नी सोनी' हे एक रोमँटीक साँग आहे, तर याआधी प्रदर्शित झालेलं गाणं डान्स नंबर होतं. या चित्रपटाचं चित्रीकरण ऑस्ट्रेलियासोबतच हैदराबाद आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये झालं आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

सुजित रेड्डी यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचं बजेट ३०० कोटी इतकं आहे. चित्रपटात निल नितीन मुकेश, अरूण विजय, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. येत्या ३० ऑगस्टला हा सिनेमा हिंदी, मल्ल्याळम, तेलुगू आणि तमिळ अशा चार भाषेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.