ETV Bharat / sitara

'जय-वीरु'च्या मैत्रीला ४४ वर्षे पूर्ण, 'शोले'च्या दिग्दर्शकाने उलगडली आठवण - अमजद खान

या चित्रपटातील संवाद, 'जय-वीरू'ची मैत्री, बसंतीची अखंड बडबड, गब्बरची दहशत आणि ठाकुरची हिम्मत या सर्वांनीच चाहत्यांवर छाप पाडली. त्यामुळे या चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी या चित्रपटाची आठवण उलगडत एक भावनिक ट्विट केले आहे.

'जय-वीरु'च्या मैत्रीला ४४ वर्षे पूर्ण, 'शोले'च्या दिग्दर्शकाने उलगडली आठवण
author img

By

Published : Aug 16, 2019, 5:20 PM IST

मुंबई - बॉलिवूडमध्ये 'शोले' म्हटलं की सर्वात आधी आठवते ती म्हणजे 'जय - वीरू'ची मैत्री. 'शोले' चित्रपट आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहे. या चित्रपटाला १५ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण झाली आहेत. सदाबहार आणि क्लासिक सिनेमा म्हणून 'शोले' चित्रपटाची ओळख आहे. या चित्रपटातील संवाद, 'जय-वीरू'ची मैत्री, बसंतीची अखंड बडबड, गब्बरची दहशत आणि ठाकुरची हिम्मत या सर्वांनीच चाहत्यांवर छाप पाडली. त्यामुळे या चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी या चित्रपटाची आठवण उलगडत एक भावनिक ट्विट केले आहे.

'शोले' चित्रपटात अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, जया भादुरी, अमजद खान, संजीव कुमार यांसारखी स्टारकास्ट होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश सिप्पी यांनी केले होते. तर, या चित्रपटाची निर्मिती त्यांचे वडील जी. पी. सिप्पी यांनी केली होती.

अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांनी जय-वीरूची भूमिका साकारली होती. तर, संजीव कुमार यांनी पोलिसाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या सर्वच पात्रांनी प्रेक्षकांना सिनेमागृहात खिळवून ठेवले होते.

रमेश सिप्पी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, की 'शोलेचे ४४ पूर्ण झाली आहेत. ही भावना खूप चांगली आहे. की, सर्व पीढींसाठी हा चित्रपट मनोरंजक ठरला'.

'शोले'मधील गाणीही त्याकाळी हिट ठरली होती. या चित्रपटातील 'ये दोस्ती हम नही तोडेंगे' हे गाणे आजही जय वीरूच्या मैत्रीची आठवण करून देते.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.