ETV Bharat / sitara

शिबानी-फरहानची रोमॅन्टिक केमेस्ट्री, रॅम्पवर दिली प्रेमाची कबुली - शिबानी

डिझायनर पायल सिंघलच्या डिझाईनसाठी ते दोघे एकत्र आले होते. यावेळी रॅम्पवर फरहानने शिबानीला साथ देत परफॉर्म केलं. त्यामुळे उपस्थितांचीही नजर दोघांवरुन हटली नाही.

शिबानी-फरहानची रोमॅन्टिक केमेस्ट्री, रॅम्पवर दिली प्रेमाची कबुली
author img

By

Published : Aug 22, 2019, 10:06 AM IST

मुंबई - बॉलिवूडमध्ये बऱ्याच सेलिब्रिटी जोड्यांच्या नात्याच्या चर्चा रंगताना दिसतात. अशातच अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचेही प्रेम दिवसेंदिवस बहरताना दिसते आहे. त्यांचे बरेचसे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता त्यांचा एक व्हिडिओ फिल्मफेअरच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये दोघांचीही रॅम्पवर रोमॅन्टिक केमेस्ट्री पाहायला मिळते.

फरहान अख्तरने शिबानी दांडेकरसोबतचा एक फोटो शेअर करुन त्यांच्या नात्याची माहिती चाहत्यांनी दिली होती. तर, शिबानी देखील तिचे आणि फरहानचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यांच्या जोडीने अलिकडेच लॅक्मे फॅशन विकमध्ये एकत्र सादरीकरण केले.

डिझायनर पायल सिंघलच्या डिझाईनसाठी ते दोघे एकत्र आले होते. यावेळी रॅम्पवर फरहानने शिबानीला साथ देत परफॉर्म केलं. त्यामुळे उपस्थितांचीही नजर दोघांवरुन हटली नाही.

फरहान सध्या 'तुफान' चित्रपटाची तयारी करत आहे. या चित्रपटात तो बॉक्सरची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यासाठी जिममध्ये तो शरीरयष्टीवर मेहनत घेताना दिसतो.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.