ETV Bharat / sitara

दिग्दर्शक शशि चंद्रकांत खंदारे यांचा क्लॅप बॉय ते डिरेक्टर या प्रवासातील पहिले पाऊल ‘जिप्सी'! - शशि चंद्रकांत खंदारे यांचा क्लॅप बॉय ते डिरेक्टर प्रवास

शशि चंद्रकांत खंदारे या तरुणाने ‘क्लॅप बॉय’ म्हणून सुरुवात केली आणि आता तो चक्क दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसताना दिसतोय. त्याच्या क्लॅप बॉय ते डिरेक्टर या प्रवासातील पहिले पाऊल म्हणजे ‘जिप्सी', तो या चित्रपटाचे तो दिग्दर्शन करीत आहे.

Marathi cinema gypsy
मराठी सिनेमा जिप्सी
author img

By

Published : Aug 3, 2021, 3:01 PM IST

चित्रपटसृष्टीत अनेक जण छोटी छोटी कामं करीत वरच्या पातळीवर पोहोचतात. अर्थात कुठलेही काम छोटं किंवा मोठं नसते, परंतु मनोरंजनसृष्टीत अशी अनेक उदाहरणं आहे. आता हेच बघाना. शशि चंद्रकांत खंदारे या तरुणाने ‘क्लॅप बॉय’ म्हणून सुरुवात केली आणि आता तो चक्क दिग्दर्शकाच्या खुर्चीत बस्तान दिसतोय. त्याच्या क्लॅप बॉय ते डिरेक्टर या प्रवासातील पहिले पाऊल म्हणजे ‘जिप्सी', तो या चित्रपटाचे तो दिग्दर्शन करीत आहे.

"जिप्सी" हा शब्द मराठी माणसांना कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या कवितेमुळे माहीत आहे. पण आता याच नावाचा चित्रपट येऊ घातला आहे. या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे प्रकाशित करण्यात आलं. यश मनोहर सणस त्यांच्या यश सणस फिल्म्स या निर्मिती संस्थेद्वारे बोलपट क्रिएशन्सच्या सहयोगाने "जिप्सी" या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. ‘जिप्सी’ या नावातून हा चित्रपट प्रवासावर आधारित असणार हे स्पष्ट आहे. पण टीजर पोस्टरमध्ये मोकळं आकाश दिसत असल्यानं चित्रपटाची कथा काय असेल याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

आतापर्यंत २५ हून अधिक चित्रपटांसाठी क्लॅप बॉय, सहाय्यक दिग्दर्शक अशा विविध जवाबदाऱ्या निभावल्यानंतर शशि चंद्रकांत खंदारे दिग्दर्शक म्हणून आपला पहिला चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. चित्रपटाची कथा देखील त्यांनीच लिहिली आहे. पुढील महिन्यात चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार असून कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा अशा तीन राज्यात चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे.

‘जिप्सी’ या चित्रपटातील कलाकारांची नावे अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.
हेही वाचा - ‘बिग बॉस’ मध्ये भाग घेणार का?”, यावर करण जोहरचे उत्तर.......!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.