ETV Bharat / sitara

श्रद्धा पुढची ५ वर्षे तरी लग्न करणार नाही - शक्ती कपूर - street dancer

श्रद्धाने ती लवकरच लग्न करणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर ती कोरियोग्राफर असलेला तिचा बॉयफ्रेन्ड रोहन श्रेष्ठासोबत लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांचे वारे वाहू लागले. या दोघांच्याही कुटुंबाकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नव्हती.

श्रद्धा पुढची ५ वर्षे तरी लग्न करणार नाही - शक्ती कपूर
author img

By

Published : Mar 22, 2019, 7:22 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या लग्नांच्या बातम्यांवरुन चांगलीच चर्चेत आहे. तिचा कथीत बॉयफ्रेन्ड रोहन श्रेष्ठासोबत लग्नगाठ बांधणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, तिच्या लग्नाच्या चर्चा या केवळ अफवा आहेत, ती पुढची ५ वर्षे तरी लग्न करणार नाही, असे श्रद्धाचे वडील शक्ती कपूर यांनी स्पष्ट केले आहे.

श्रद्धाने एका माध्यमाच्या मुलाखतीत ती लवकरच लग्न करणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर ती कोरियोग्राफर असलेला तिचा बॉयफ्रेन्ड रोहन श्रेष्ठासोबत लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांचे वारे वाहू लागले. या दोघांच्याही कुटुंबाकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नव्हती.

यावर आता शक्ती कपूर यांनी दिलेली प्रतिक्रीया समोर आली आहे. एका आघाडीच्या माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, शक्ती कपूर यांनी म्हटले आहे, की 'श्रद्धाचा सध्या लग्न करण्याचा कोणताही मानस नाही. पुढची ५ वर्षे तरी ती लग्न करणार नाही. तिच्याकडे सध्या बऱ्याच चित्रपटांचे काम आहे. त्यामुळे सध्या तिचे सर्व लक्ष तिच्या आगामी चित्रपटांकडे असल्याचेही त्यांनी सांगितले.

रोहन श्रेष्ठासोबत असलेल्या नात्याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'श्रद्धाचे अनेक अभिनेत्यांसोबत नाव जोडले गेले आहे. ही चित्रपटसृष्टी आहे. नाव जोडले गेले म्हणजे ते खरे असेलच असे नाही. रोहनचे वडील माझे खूप चांगले मित्र आहेत. त्यामुळे रोहन श्रद्धाचा खूप चांगला मित्र आहे. माझी मुलगी तिच्या आयुष्यात घडत असलेली प्रत्येक गोष्ट शेअर करत असते. त्यामुळे ती सध्या लग्न करणार नाही, असेही ते म्हणाले.

सध्या श्रद्धा कपूर 'साहो'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटासोबतच ती 'स्ट्रीट डान्सर', 'छिछोरे' आणि सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे.

Intro:Body:

ENTERTAINMENT 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.