ETV Bharat / sitara

'किंग खान' शाहरुखच्या हस्ते 'स्माईल प्लिज' सिनेमाच ट्रेलर आणि म्युजिक लाँच - music

सिनेमात मुक्ता बर्वे, ललित प्रभाकर, प्रसाद ओक, तृप्ती खामकर, अदिती गोवित्रीकर, सतीश आळेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सगळ्यांनी छानच काम केलं असेल याची खात्री असल्याचं शाहरुखने सांगितलं.

'किंग खान' शाहरुखच्या हस्ते 'स्माईल प्लिज' सिनेमाच ट्रेलर आणि म्युजिक लाँच
author img

By

Published : Jun 28, 2019, 8:10 AM IST

Updated : Jun 28, 2019, 11:17 AM IST

मुंबई - विक्रम फडणीस दिग्दर्शित 'स्माईल प्लिज' सिनेमाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख हा खास पाहुणा म्हणून उपस्थित राहिला.

या म्युजिक लाँच सोहळ्याला आपल्या सवयीनुसार उशीरा आलेल्या शाहरुखने आल्या आल्या सगळ्यांची माफी मागितली. त्यानंतर या सिनेमाचं तोंड भरून कौतुक केलं. खर तर सध्या आपण चांगल्या सिनेमाबद्दल वक्तव्य करू शकत नाही. मात्र, विक्रमला आपण कायमच ऍक्शन कॉमेडी सिनेमा बनव असं सांगत असतो. मात्र, त्याने हा सिनेमा मनातला असल्याचं मला सांगितलं. ज्या गोष्टी मनापासून बनवल्या जातात त्या नेहमीच चांगल्या बनतात, अस शाहरुखने यावेळी नमूद केलं.

'किंग खान' शाहरुखच्या हस्ते 'स्माईल प्लिज' सिनेमाच ट्रेलर आणि म्युजिक लाँच

सिनेमात मुक्ता बर्वे, ललित प्रभाकर, प्रसाद ओक, तृप्ती खामकर, अदिती गोवित्रीकर, सतीश आळेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सगळ्यांनी छानच काम केलं असेल याची खात्री असल्याचं शाहरुखने सांगितलं. तर या कलाकारांनीही शाहरुखच्या येण्याने सोहळ्याला चार चांद लागल्याचं सांगितलं. शाहरुखने सिनेमाच्या स्टारकास्ट सोबत आणि टेक्निकल टीमसोबत सुद्धा फोटोसेशन केलं.

विक्रम फडणीसने घातलेल्या गोल्डन टायवरून त्याने त्याची फिरकी घेण्याची संधी सोडली नाही. अखेर शाहरुखचा आक्षेप मान्य करून विक्रमने हा टाय गळ्यातून काढून टाकला.
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, सनशाईन स्टुडिओज, हॅशटॅग स्टुडिओज आणि करित्यावत प्रोडक्शन यांनी मिळून या सिनेमाची निर्मिती केली आहे. गायिका बेला शेंडे, अवधूत गुप्ते, सुनिधी चौहान, रोहन प्रधान यांनी रोहन-रोहन या जोडीने संगितबद्ध केलेल्या गीतांना स्वरसाज दिला आहे. तर बोस्को- सिजर यांनी सिनेमातली गाणी कोरिओग्राफ केली आहेत. येत्या १९ जुलै रोजी हा सिनेमा रिलीज होतोय.

Intro:विक्रम फडणीस दिग्दर्शित 'स्माईल प्लिज' सिनेमाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच मुंबईत पार पडला.या सोहळ्याला किंग खान शाहरुख हा खास पाहुणा म्हणून उपस्थित राहिला.

या म्युजिक लाँच सोहळ्याला आपल्या सवयीनुसार उशीरा आलेल्या शाहरुखने आल्या आल्या सगळ्याची माफी मागितली. त्यानंतर या सिनेमाचं तोंड भरून कौतुक केलं. खर तर सध्या आपण चांगल्या सिनेमाबद्दल वक्तव्य करू शकत नाही मात्र विक्रमला आपण कायमच ऍक्शन कॉमेडी सिनेमा बनव अस सांगत असतो, पण त्याने हा सिनेमा मनातला असल्याचं मला सांगितलं. ज्या गोष्टी मनापासून बनवल्या जातात त्या नेहमीच चांगल्या बनतात अस शाहरुखने नमूद केलं.

सिनेमात मुक्ता बर्वे, ललित प्रभाकर, प्रसाद ओक, तृप्ती खामकर, अदिती गोवित्रीकर, सतीश आळेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सगक्यांनी छानच काम केलं असेल याची खात्री असल्याचं शाहरुखने सांगितलं. तर या कलाकारांनीही शाहरुखच्या येण्याने सोहळ्याला चार चांद लागल्याचं सांगितलं. शाहरुखने सिनेमाच्या स्टारकास्ट सोबत आणि टेक्निकल टीमसोबत सुद्धा फोटोसेशन केलं.

विक्रम फडणीसने घातलेल्या गोल्डन टायवरून त्याने त्याची फिरकी घेण्याची संधी सोडली नाही. अखेर शाहरुखचा आक्षेप मान्य करून विक्रमने हा टाय गळ्यातून काढून टाकला.

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, सनशाईन स्टुडिओज, हॅशटॅग स्टुडिओज आणि करित्यावत प्रोडक्शन यांनी मिळून या सिनेमाची निर्मिती केली आहे. संगीतकार रोहन- रोहन यांच्या जोडीने सिनेमाला संगीत दिल आहे. तर बेला शेंडे, अवधूत गुप्ते, सुनिधी चौहान, रोहन प्रधान यांनी सिनेमातली गाणी लिहिली आहेत. तर बोस्को- सिजर यांनी सिनेमातली गाणी कोरिओग्राफ केली आहेत. येत्या 19 जुलै रोजी हा सिनेमा रिलीज होतोय.

Body:.

Conclusion:.
Last Updated : Jun 28, 2019, 11:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.