बऱ्याचदा चित्रपटाचे कथानक म्हटलं की, काही चांगल्या प्रवृत्ती विरूध्द काही वाईट प्रवृत्तींचा लढा असतो. पण काही कथा सत्य-असत्य, पाप-पुण्याच्या पलिकडच्या असतात. हितेशा देशपांडे, शोभिता मांगलिक निर्मित आणि सौरभ सिन्हा दिग्दर्शित सावट चित्रपटही योग्य-अयोग्याच्या पल्याडच्या गुढ, रहस्यमयी प्रवासाच्या वाटेवर नेणारा चित्रपट आहे. अलिकडेच या चित्रपटाचा नवा टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे.
एका गावात ७ वर्षात ७ आत्महत्या होतात. या सगळ्या आत्महत्या श्रावण महिन्यातच होतात. विशेष म्हणजे यातल्या प्रत्येक आत्महत्येचा एक साक्षीदार आहे. या प्रत्येकानेच कोणाला तरी पाहिलंय. कोणाला? हे अद्याप गुलदस्त्यात आहे
'सावट' कथेचे यापूर्वी २ टीजर प्रदर्शित करण्यात आले आहेत.
हितेशा देशपांडे आणि शोभिता मांगलिक निर्मित आणि सौरभ सिन्हा दिग्दर्शित 'सावट' चित्रपटाचा हा नवा टीजर पाहून कोणाच्याही मनात प्रश्नांचे डोंगर उभे राहतील. या टिजरमधून चित्रपटात नक्कीच गूढ, थरारक आणि रंजक कथानक असेल याचा अंदाज येतो.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
याविषयी 'सावट'ची निर्माती हितेशा देशपांडे म्हणतात, 'मराठीत एक म्हण आहे, जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. तसंच काहीसं 'सावट' सिनेमाबाबतही आहे. सत्य-असत्याच्या रेषेवरचे अनेक प्रश्न असतात. त्या प्रश्नांचे सावटचं ब-याचदा माणसाच्या मनावर असते. मग तो उगीच घाबरून श्रध्दा-अंधश्रध्देच्या कचाट्यात सापडतो.
सौरभ सिन्हा दिग्दर्शित 'सावट' चित्रपटात स्मिता तांबे, मिलिंद शिरोळे, श्वेतांबरी घुटे आणि संजीवनी जाधव मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २२ मार्च २०१९ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.