मुंबई - तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या आणि २००० गाण्यांची कोरिओग्राफी केलेल्या ज्येष्ठ कोरिओग्राफर सरोज खान यांनी आज जगाचा निरोप घेतला. सरोजजी इन्स्टाग्रामवर सक्रिय होत्या आणि त्यांनी सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर शोक व्यक्त करणारी पोस्ट लिहिली होती. ही पोस्ट त्यांची शेवटची ठरली.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सुशांतचा फोटो शेअर करीत सरोज खान यांनी लिहिले होते, "मी तुझ्याबरोबर कधीच काम केले नव्हते. पण आम्ही बर्याच वेळा भेटलो होतो. तुझ्या आयुष्यात काय चुकले? मला आश्चर्य वाटले की तू जीवनात असे कठोर पाऊल उचलले. तू एखाद्या वडिलधाऱ्याशी बोलू शकला असतास, जे तुला मदत करू शकले असते आणि आम्हाला आनंदित ठेवू शकले असते. देव तुझ्या आत्म्याला शांती देवो. मला माहित नाही की तुमचे वडील व बहीण यांच्यावर कोणता प्रसंग गुदरला असेल. त्यांना या प्रसंगात सावरण्यासाठी सामर्थ्य मिळो. तुझ्या सर्व चित्रपटांवर प्रेम केले आणि तुझ्यावर नेहमीच प्रेम करीन. श्रध्दांजली."
कोरिओग्राफर सरोज खान यांनी शुक्रवारी पहाटे १ वाजून ४५ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना श्वासाचा त्रास होत असल्यामुळे १७ जून रोजी मुंबईच्या गुरू नानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सरोज यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोकलहर पसरली आहे. अनेक सिनेतारकांनी सरोज खान यांना श्रध्दांजली वाहिली आहे.