मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान अल्पावधीतच चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाली आहे. 'केदारनाथ' आणि 'सिंबा' या चित्रपटातून तिने आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. विविध पुरस्कार सोहळ्यातही ती हजेरी लावत असते. अलिकडेच तिने 'किड्स चॉईस अवार्ड्स' सोहळ्यात माधुरीच्या 'एक, दोन, तीन' गाण्यावर डान्स सादर केला. तिच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
साराच्या डान्सचा व्हिडिओ आत्तापर्यंत ३ लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. तिला या पुरस्कार सोहळ्यात पुरस्कारही मिळाला आहे. या पुरस्कारासोबतचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -भाईजानची पडद्यावर पुन्हा जादू, 'दबंग ३'ची पहिल्या दिवशीची दमदार ओपनिंग
या पुरस्कार सोहळ्यात अभिनेता कार्तिक आर्यन, आयुष्मान खुराना, क्रिती सेनॉन, भूमी पेडणेकर यांचीही उपस्थिती होती.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, सारा लवकरच कार्तिक आर्यनसोबत 'आजकल' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचं शूटिंगही पूर्ण झालं आहे. सैफ अली खानच्या 'लव्ह आज कल' चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. तसेच, वरुण धवनसोबतही ती 'कुली नंबर वन' चित्रपटात भूमिका साकारत आहे. हा चित्रपट देखील गोविंदा आणि रविना टंडन यांच्या 'कुली नंबर वन'चा रिमेक आहे. तिच्या या दोन्ही चित्रपटांची चाहत्यांना आतुरता आहे.
हेही वाचा -अतरंगी अंदाजात थिरकवणारं 'धुरळा'चं पहिलं गाणं 'नाद करा' प्रदर्शित