ETV Bharat / sitara

संजय दत्तची कॅन्सरवर मात : डॉक्टरांनी सांगितले होते ५०-५० टक्के जगण्याची संधी

author img

By

Published : Feb 8, 2021, 2:02 PM IST

आयुष्यात अनेक चढ उतार पाहिलेल्या अभिनेत्यांमध्ये सजय दत्तचे नाव सामील आहे. अलिकडेच त्याला फुफ्फुसाचा कॅन्सर झाला होता. या आजाराशी त्याने यशस्वी संघर्ष केला आहे. कर्करोग दिनाच्या निमित्ताने या आजाराशी त्याने कसे दोन हात केले याबद्दल सांगितले आहे.

Sanjay Dutt
संजय दत्त

मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्तने कॅन्सरशी केलेल्या सामन्याची आठवण सांगितली. डॉक्टरांनी त्याला जगण्याचे ५० - ५० टक्के चान्स असल्याची कल्पना त्याला दिली होती. इच्छाशक्ती आणि सकारात्मक दृष्टीकोन बाळगल्यामुळेच या जीवघेण्या आजाराशी तो झुंजू शकला, असे तो म्हणाला.

जागतिक कर्करोग दिन २०२१ रोजी संजय दत्तने व्हर्च्युअल पत्रकार परिषदेमध्ये चौथ्या स्टेजवर असलेल्या कॅन्सरशी कसा मुकाबला केला त्याचा अनुभव सांगितला.

"जेव्हा ही बातमी ब्रेक झाली तेव्हा माझ्या मनात खूप राग आला होता आणि मीच का याचे मला आश्चर्य वाटले होते. अशावेळी उपचार काय करावेत हे ठरवण्यासाठी लोक भरपूर वेळ घेतात. परंतु मी लगेचच निर्णय घेतला कारण माझ्याकडे पुरेसा वेळ नव्हता. तेव्हा मी या आजाराचा स्वीकार केला आणि मी विचार केला की कॅन्सर काहीही असो आपण त्याचा मुकाबला करायचा. जेव्हा मी डॉ. शेवंती लिमये यांना भेटलो तेव्हा माझ्या मनात हा विचार पक्का झाला होता.", असे संजय दत्त म्हणाला.

डॉ. शेवंती यांच्यासोबत उपचाराबाबत चर्चा करीत होता तेव्हा त्याच्या मनात कोणते विचार सुरू होते याविषयी विचारले असता संजय दत्त म्हणाला, “मला दिलासा वाटला. एक वेळ अशी होती जेव्हा त्यांनी मला सांगितले की जगण्याीच ५०-५० टक्के संधी आहे आणि तू डॉक्टरांच्या बाजून ५० टक्के सकारात्मक असावेस. या वाक्याने माझ्यात खूप मोठा बदल झाला. त्याचवेळी मी निश्चय केला की काहीही झाले तरी सकारात्मक बाजूने राहायचे."

संजय दत्तचे ऑगस्ट २०२०मध्ये कर्करोगाचे निदान झाले आणि त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे समोर आले. ऑक्टोबरमध्ये संजय दत्तने एक आरोग्य अपडेट शेअर केले होते आणि तो म्हणाला होता की, या आजाराशी लढताना तो विजयी झाला आहे.

हेही वाचा - वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या करणची यश आणि रुहीने घेतली मजा; पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.