ETV Bharat / sitara

कॅटरिनाने मला 'भाईजान' नाही तर 'हे' नाव द्यावे, सलमानने व्यक्त केली इच्छा - disha patani

बॉलिवूडमध्ये 'भाईजान' नावाचा दबदबा असलेल्या सलमान खानचा 'भारत' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकतेच या चित्रपटातले 'जिंदा हु मै' हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्याच्या लाँचिंग दरम्यान सलमान आणि कॅटरिना यांनी माध्यमांशी संवाद साधला.

कॅटरिनाने मला 'भाईजान' नाही तर 'हे' नाव द्यावे, सलमानने व्यक्त केली इच्छा
author img

By

Published : May 17, 2019, 5:52 PM IST

मुंबई - बॉलिवूडमध्ये 'भाईजान' नावाचा दबदबा असलेल्या सलमान खानचा 'भारत' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकतेच या चित्रपटातले 'जिंदा हु मै' हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्याच्या लाँचिंग दरम्यान सलमान आणि कॅटरिना यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांची मजेदार बॉन्डिंग पाहायला मिळाली.

'भारत' चित्रपटाच्या निमित्ताने सलमान आणि कॅटरिनाची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचीही पसंती मिळते. सलमानचे चाहते त्याला नेहमी 'भाईजान' या नावाने हाक मारतात. त्यामुळे गाण्याच्या लाँचिंग दरम्यान एका पत्रकाराने कॅटरिनाला 'भाईजान' सोबत काम करताना कसा अनुभव आला, असा प्रश्न विचारला. यावर सलमान मध्येच माईक हातात घेऊन म्हणाला, की 'मी तुमचा 'भाईजान' आहे. कॅटरिनाचा नाही'. यावर कॅटरिनाने हसून प्रतिक्रिया दिली. त्यानंतर सलमान खानला प्रश्न विचारण्यात आला, की कॅटरिनाने तुला कोणत्या नावाने बोलवावे असे तुला वाटते? यावर सलमानने 'मेरी जान' असे उत्तर दिले.

Salman Khan and katrina kaif
सलमान खान आणि कॅटरिना कैफ संवाद साधताना

त्यानंतर कॅटरिनानेही त्याला हसून दाद दिली. या चित्रपटात काम करण्याचा अनुभव अत्यंत चांगला होता, असेही ती यावेळी म्हणाली. तर कॅटरिनाला या चित्रपटातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळेल, असे सलमान खान म्हणाला. 'भारत' चित्रपटातून प्रियांकाने माघार घेतल्यानंतर कॅटरिनाची या चित्रपटात वर्णी लागली होती. तिच्यामुळेच कॅटरिनाला ही आजवरची सर्वोत्कृष्ट भूमिका साकारण्याची संधी मिळाली, असेही तो म्हणाला.

Salman Khan and katrina kaif
सलमान खान आणि कॅटरिना कैफ संवाद साधताना

'भारत' चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले आहे. तर, या चित्रपटात सलमान, कॅटरिनासह दिशा पटाणी, तब्बू, जॅकी श्रॉफ, नोरा फतेही, सुनिल ग्रोवर हे कलाकारही झळकणार आहेत. ५ जूनला 'ईद'च्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Intro:Body:

ent news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.