मुंबई - छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत असणारा शो म्हणजे बिग बॉस'. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान नेहमीप्रमाणे यावेळी देखील स्पर्धकांची शाळा घेण्यासाठी सज्ज झाला आहे. बिग बॉसच्या अकराव्या पर्वात नवनविण ट्विस्ट आणि रंजक स्पर्धेमुळे टीआरपीच्या शर्यतीतही हा शो अग्रस्थानी असतो. त्यामुळे यावेळीही नविण योजनांसोबत 'बिग बॉस' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या शोचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
'बिग बॉस १३'च्या टीझरमध्ये सलमान खान स्टेशन मास्टरच्या भूमिकेत पाहायला मिळतो. अद्याप हा शो केव्हापासून प्रसारित होणार, याबद्दलची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, या टीजझरवरुन या शोमध्ये बरेचसे ट्विस्ट पाहायला मिळणार असल्याचा अंदाज लावता येतो. सलमानने त्याच्या खास अंदाजात या शोचा प्रोमो शूट केला आहे.
-
Get ready to hop on to the #BB13 entertainment express along with @Vivo_India ek dum fatafat! 😍#BiggBoss13 Coming soon! @BeingSalmanKhan pic.twitter.com/7wgmsxqKgt
— COLORS (@ColorsTV) August 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Get ready to hop on to the #BB13 entertainment express along with @Vivo_India ek dum fatafat! 😍#BiggBoss13 Coming soon! @BeingSalmanKhan pic.twitter.com/7wgmsxqKgt
— COLORS (@ColorsTV) August 24, 2019Get ready to hop on to the #BB13 entertainment express along with @Vivo_India ek dum fatafat! 😍#BiggBoss13 Coming soon! @BeingSalmanKhan pic.twitter.com/7wgmsxqKgt
— COLORS (@ColorsTV) August 24, 2019
काय असणार खास -
'बिग बॉस १३'च्या टीजरमधुन या शोमध्ये यावेळी सेलिब्रीटींचा समावेश असणार हे स्पष्ट होते. त्यामुळे हे कलाकार कोणते असणार, याची चाहत्यांना उत्सुकता आहे. ४ आठवड्यांमध्येच हा शो फिनालेपर्यंत पोहचणार आहे. मात्र, त्यानंतरही कार्यक्रमात जे सेलिब्रीटी असतील, त्यांच्यात स्पर्धा पाहायला मिळेल. बिग बॉसच्या घराचे इंटेरिअर डिझाईनही यावेळी वेगळे पाहायला मिळेल.
कधी होणार सुरू -
टीझरमधुन शोची तारीख जाहीर केली नसली, तरीही २९ सप्टेंबर पासून कार्यक्रमाची सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे.
या कलाकारांची चर्चा -
अद्याप बिग बॉसने कलाकारांची यादी जाहीर केली नाही. मात्र, चंकी पांडे, राजपाल यादव, करण पटेल, शिविन नारंग, करण वोहरा, टीना दत्ता, देबलीना, अंकिता लोखंडे यांच्या नावाची चर्चा आहे.
कुठे असेल सेट -
यावेळी मुंबईमध्ये फिल्म सिटीतच बिग बॉसचा सेट उभारण्यात आला आहे. नेहमी लोणावळा येथे बिग बॉसचे घर उभारले जाते. मात्र, अधिकाधिक टीआरपी मिळवण्यासाठी यावेळी मुंबईतच सेट उभारला जाणार आहे.
आता यंदाच्या बिग बॉसमध्ये काय काय खेळ रंगतात, हे पाहणे रंजक ठरेल.