ETV Bharat / sitara

संजय लीला भन्साळींच्या 'ईन्शाल्ला'मधून भाईजानची माघार - संजय लीला भन्साळी

'ईन्शाल्ला' चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर या चित्रपटात सलमान खान आणि आलिया भट्ट भूमिका साकारणार असल्याचे बोलले गेले होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती सलमानने दिली होती.

संजय लीला भन्साळींच्या 'ईन्शाल्ला'मधून भाईजानची माघार
author img

By

Published : Sep 19, 2019, 8:27 AM IST

मुंबई - बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि संजय लीला भन्साळी हे 'ईन्शाल्ला' चित्रपटासाठी एकत्र येणार होते. सलमानने या चित्रपटाबाबत त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती देखील दिली होती. मात्र, आता भाईजानने या चित्रपटातून माघार घेतली असल्याचं स्पष्ट केलं आहे.

'ईन्शाल्ला' चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर या चित्रपटात सलमान खान आणि आलिया भट्ट भूमिका साकारणार असल्याचे बोलले गेले होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती सलमानने दिली होती. त्यानंतर आता त्याने या चित्रपटातून माघार घेतली आहे.

'आयफा अवार्डस २०१९' या पुरस्कार सोहळ्यात सलमानने याबाबत माहिती दिली आहे. यावेळी त्याने महेश मांजरेकर यांची मुलगी सई हिच्यासोबत हजेरी लावली होती.

यावेळी त्याने माध्यमांच्या प्रतिनीधींशी संवाद साधला. 'आता 'ईन्शाल्ला' चित्रपट सध्या थांबला आहे. त्याचं शूटिंग होईल. मात्र, हा चित्रपट माझ्याशिवाय तयार होईल', असे तो यावेळी म्हणाला.

दरम्यान, त्याने सई मांजरेकरची ओळख करुन दिली. सई त्याच्यासोबत 'दबंग ३' या चित्रपटात झळकणार आहे. सोनाक्षी सिन्हाची देखील त्याने आयफा सोहळ्यातच ओळख करुन दिली होती. आता सईची वेळ आहे. सईदेखील पडद्यावर तिच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकेल', असेही तो म्हणाला.

हेही वाचा-आयफा अवार्ड्स २०१९: आलिया सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर रणवीर ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

तब्बल १९ वर्षानंतर संजय लीला भन्साळी आणि सलमान खान एकत्र येणार होते. सलमानने भन्साळींच्या 'हम दिल दे चुके सनम' आणि 'खामोशी' या चित्रपटात भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर ते पुन्हा एकत्र येणार होते. ईदच्या मुहूर्तावर 'ईन्शाल्ला' चित्रपट प्रदर्शित होणार, असेही बोलले गेले होते. आता ईदच्या मुहूर्तावर सलमान खानचा कोणता चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

हेही वाचा-पाहा, थरारक अॅक्शन, नेत्रदिपक दृष्ये आणि वेड लावणारी भव्यता असलेला 'सैरा'चा ट्रेलर

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.