ETV Bharat / sitara

'भारत'नंतर दिशा पटाणीची पुन्हा सलमानसोबत वर्णी, या चित्रपटात झळकणार एकत्र - salman khan upcomming films

सलमानने या चित्रपटाच्या टीमचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सलमान खानसोबत अतुल अग्नीहोत्री, प्रभू देवा, सोहेल खान, दिशा पटाणी, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हुडा यांची झलक पाहायला मिळते. रणदीपने सलमान खानसोबत 'सुलतान' चित्रपटात भूमिका साकारली होती. तर, जॅकी श्रॉफ यांची झलक 'भारत'मध्ये दिसली होती.

'भारत'नंतर दिशा पटाणीची पुन्हा सलमानसोबत वर्णी, या चित्रपटात झळकणार एकत्र
author img

By

Published : Nov 1, 2019, 5:43 PM IST

मुंबई - यंदाच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये सलमान खानच्या 'भारत' चित्रपटाने स्थान पटकावले आहे. पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करून नंतरही या चित्रपटाने बरेच विक्रम आपल्या नावी केले होते. या चित्रपटात सलमान खान आणि दिशा पटाणीची जोडी पाहायला मिळाली होती. दिशाने पहिल्यांदाच या चित्रपटात त्याच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती. आता पुन्हा एकदा सलमान खानसोबत तिची वर्णी लागली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या जोडीला पडद्यावर एकत्र पाहता येणार आहे.

'राधे' असं या चित्रपटाचं नाव असणार आहे. प्रभू देवा या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. प्रभू देवासोबतही सलमान खानचा हा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी प्रभू देवा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'वान्टेड' आणि आता लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'दबंग ३' मध्ये सलमानने भूमिका साकारल्या आहेत. आता 'राधे' चित्रपटाच्या निमित्ताने तो पुन्हा एकदा प्रभू देवासोबत काम करणार आहे.

हेही वाचा -प्रथमेश परब सिनेमासाठी होणार 'टल्ली'

सलमान खानचा २००३ साली प्रदर्शित झालेल्या 'तेरे नाम' या चित्रपटातील पात्र हे 'राधे' नावाचं होतं. 'वान्टेड' मध्येही त्याचं नाव 'राधे' असंच होतं. मात्र, आता 'राधे' असं शिर्षक असलेला चित्रपटच तयार होणार असल्याने फार उत्सुक असल्याचं सलमानने सांगितलं आहे. 'राधे' हा 'वान्टेड'चाही बाप असेल, असंही तो म्हणाला.

सलमानने या चित्रपटाच्या टीमचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सलमान खानसोबत अतुल अग्नीहोत्री, प्रभू देवा, सोहेल खान, दिशा पटाणी, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हुडा यांची झलक पाहायला मिळते. रणदीपने सलमान खानसोबत 'सुलतान' चित्रपटात भूमिका साकारली होती. तर, जॅकी श्रॉफ यांची झलक 'भारत'मध्ये दिसली होती. लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होईल.

हेही वाचा -अभिनेता स्वप्नील जोशी आता प्रेक्षकांना घाबरवणार, 'बळी'मध्ये दिसणार मुख्य भूमिकेत

Intro:Body:

Salman Khan and disha patani reunite for Radhe film

key words - Salman Khan and disha patani reunite, Radhe film update, radhe film latest news, Prabhu Dheva reunite with salman khan, Radhe film release date, radhe film news, salman khan latest news, salman khan upcomming films, Disha patani in Radhe film

'भारत'नंतर दिशा पटाणीची पुन्हा सलमानसोबत वर्णी, या चित्रपटात झळकणार एकत्र

मुंबई - यंदाच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये सलमान खानच्या 'भारत' चित्रपटाने स्थान पटकावले आहे. पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करुन नंतरही या चित्रपटाने बरेच विक्रम आपल्या नावी केले होते. या चित्रपटात सलमान खान आणि दिशा पटाणीची जोडी पाहायला मिळाली होती. दिशाने पहिल्यांदाच या चित्रपटात त्याच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती. आता पुन्हा एकदा सलमान खानसोबत तिची वर्णी लागली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या जोडीला पडद्यावर एकत्र पाहता येणार आहे. 

'राधे' असं या चित्रपटाचं नाव असणार आहे. प्रभू देवा या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. प्रभू देवासोबतही सलमान खानचा हा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी प्रभू देवा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'वान्टेड' आणि आता लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'दबंग ३' मध्ये सलमानने भूमिका साकारल्या आहेत. आता 'राधे' चित्रपटाच्या निमित्ताने तो पुन्हा एकदा प्रभू देवासोबत काम करणार आहे. 

सलमान खानचा २००३ साली प्रदर्शित झालेल्या 'तेरे नाम' या चित्रपटातील पात्र हे 'राधे' नावाचं होतं. 'वान्टेड' मध्येही त्याचं नाव 'राधे' असंच होतं. मात्र, आता 'राधे' असं शिर्षक असलेला चित्रपटच तयार होणार असल्याने फार उत्सुक असल्याचं सलमानने सांगितलं आहे. 'राधे' हा 'वान्टेड'चाही बाप असेल, असंही तो म्हणाला. 

सलमानने या चित्रपटाच्या टीमचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सलमान खानसोबत अतुल अग्नीहोत्री, प्रभू देवा, सोहेल खान, दिशा पटाणी, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हुडा यांची झलक पाहायला मिळते. रणदीपने सलमान खानसोबत 'सुलतान' चित्रपटात भूमिका साकारली होती. तर, जॅकी श्रॉफ यांची झलक 'भारत'मध्ये दिसली होती.   

लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होईल. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.