मुंबई - संगीतकार सलील कुलकर्णी यांनी 'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटातून दिग्दर्शनात उडी घेतली आहे. या चित्रपटाच्या यशानंतर आता पुन्हा ते 'एकदा काय झालं' या चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
'वेडिंगचा शिनेमा' चित्रपटाप्रमाणेच सलील कुलकर्णी या चित्रपटाचंही लेखन, दिग्दर्शन आणि संगीत या सर्वांची जबाबदारी पार पाडणार आहेत. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.
-
गणपतीबाप्पा मोरया !!
— Saleel Kulkarni (@KulkarniSaleel) September 2, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Gajavadana Productions and
Show Box Entertainment निर्मित
" एकदा काय झालं .. "
Written and Directed By Dr . Saleel Kulkarni . @docbhooshan@Shankar_Live@amitphalke@abpmajhatv @TheZeeStudios @News18lokmat @zee24taasnews @marathimovies @RajshriMarathi pic.twitter.com/VYM3pmnJky
">गणपतीबाप्पा मोरया !!
— Saleel Kulkarni (@KulkarniSaleel) September 2, 2019
Gajavadana Productions and
Show Box Entertainment निर्मित
" एकदा काय झालं .. "
Written and Directed By Dr . Saleel Kulkarni . @docbhooshan@Shankar_Live@amitphalke@abpmajhatv @TheZeeStudios @News18lokmat @zee24taasnews @marathimovies @RajshriMarathi pic.twitter.com/VYM3pmnJkyगणपतीबाप्पा मोरया !!
— Saleel Kulkarni (@KulkarniSaleel) September 2, 2019
Gajavadana Productions and
Show Box Entertainment निर्मित
" एकदा काय झालं .. "
Written and Directed By Dr . Saleel Kulkarni . @docbhooshan@Shankar_Live@amitphalke@abpmajhatv @TheZeeStudios @News18lokmat @zee24taasnews @marathimovies @RajshriMarathi pic.twitter.com/VYM3pmnJky
हेही वाचा-आयुष्मान खुराना - नुसरत भरुचाची रोमॅन्टिक केमेस्ट्री, पाहा 'ड्रीमगर्ल'चं नवं गाणं
'एकदा काय झालं'च्या पोस्टरमध्ये वडिल आणि मुलाच्या पाठमोऱ्या आकृती पाहायला मिळतात. त्यामुळे या चित्रपटातील कलाकारांची नावं गुलदस्त्यात आहेत. चित्रपटाच्या शिर्षकावरुन ही एखादी गोष्ट असावी, असा अंदाज येतो. गजवदन प्रॉडक्शन्स आणि शो बॉक्स एंटरटेन्मेंट या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
हेही वाचा-हिमेश रेशमियाच्या 'या' गाजलेल्या गाण्याला राणू मंडलचा स्वरसाज, रेकॉर्ड केलं तिसरं गाणं
गणेश चतुर्थीच्या पर्वावर या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करुन सलील यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.