ETV Bharat / sitara

रोहित शेट्टी बनवणार 'चेन्नई एक्सप्रेस २', 'ही' जोडी साकारणार भूमिका? - Rohit Shetty latest news

२०१३ साली शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांची मुख्य भूमिका असलेला 'चेन्नई एक्सप्रेस' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. याच चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याची इच्छा रोहितने व्यक्त केली आहे.

Rohit Shetty on Chennai Express 2, Sara ali khan And Kartik Aryan to on board For Chennai Express 2, 'चेन्नई एक्सप्रेस २', दिग्दर्शक रोहित शेट्टी, Rohit Shetty latest news, Rohit Shetty films
रोहित शेट्टी बनवणार 'चेन्नई एक्सप्रेस २', 'ही' जोडी साकारणार भूमिका?
author img

By

Published : Feb 7, 2020, 8:06 AM IST

मुंबई - दिग्दर्शक रोहित शेट्टीने आजवर बरेच सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. २०१३ साली शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांची मुख्य भूमिका असलेला 'चेन्नई एक्सप्रेस' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. याच चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याची इच्छा रोहितने व्यक्त केली आहे. जर, या चित्रपटाचा दुसरा भाग बनवण्यात आला, तर यामध्ये कोणते कलाकार मुख्य भूमिकेत असतील, याचीही हिंट त्याने दिली आहे.

एका माध्यमाच्या मुलाखतीत रोहितला 'चेन्नई एक्सप्रेस'च्या सिक्वेलबाबत प्रश्न विचारण्यात आला. या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन आणि सारा अली खानची जोडी मुख्य भूमिकेत घेण्याची इच्छा असल्याचे त्याने सांगितले.

Rohit Shetty on Chennai Express 2, Sara ali khan And Kartik Aryan to on board For Chennai Express 2, 'चेन्नई एक्सप्रेस २', दिग्दर्शक रोहित शेट्टी, Rohit Shetty latest news, Rohit Shetty films
भिनेता कार्तिक आर्यन आणि सारा अली खान

हेही वाचा -अमेरिकेतील लाईव्ह शो सलमानने केला रद्द, जाणून घ्या कारण?...

सारा आणि कार्तिक यांचा पहिला एकत्रित चित्रपट 'लव्ह आज कल' अजून प्रदर्शित झाला नाही. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच ही जोडी चाहत्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. त्यामुळे दोघांची जोडी 'चेन्नई एक्सप्रेस'च्या सिक्वेलमध्ये असावी, अशी इच्छा रोहितने व्यक्त केली.

साराने तिच्या करिअरच्या सुरुवातीपासूनच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. 'केदारनाथ' चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर रोहित शेट्टीच्या 'सिंबा' चित्रपटातही तिने भूमिका साकारली होती. आता इम्तियाज अलीच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'लव्ह आज कल' चित्रपटात ती भूमिका साकारताना दिसणार आहे. तर, दिग्दर्शक आनंद एल. राय यांच्या आगामी 'अतरंगी रे' या चित्रपटाचीही तिने घोषणा केली आहे.

हेही वाचा -'लव्ह आज कल'च्या प्रमोशनमध्ये रघुच्या ड्रेसमध्ये अवतरला कार्तिक आर्यन

'लव्ह आज कल' चित्रपटानंतर ती डेव्हिड धवनच्या 'कुली नंबर वन'च्या रिमेकमध्ये वरुण धवनसोबत दिसणार आहे. दुसरीकडे कार्तिक आर्यन देखील 'दोस्ताना', 'भूल भुलैय्या २' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसेल.

त्यांचा आगामी 'लव्ह आज कल' हा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.