ETV Bharat / sitara

वीरू देवगन यांच्यासाठी रोहित शेट्टीची भावनिक पोस्ट - social media

वीरू देवगन यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी अजय देवगनच्या घरी भेट दिली. दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अजय देवगन यांची मैत्री देखील सर्वपरिचीत आहे. त्यांच्या आठवणीत त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

वीरू देवगन यांच्यासाठी रोहित शेट्टीची भावनिक पोस्ट
author img

By

Published : Jun 1, 2019, 10:36 AM IST

मुंबई - अभिनेता अजय देवगनचे वडील आणि सुप्रसिद्ध स्ंटटमॅन अशी ओळख असलेले वीरू देवगन यांच्या निधनाने बॉलिवूड कलाकारांना चांगलाच धक्का बसला. वीरू देवगन यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी अजय देवगनच्या घरी भेट दिली. दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अजय देवगन यांची मैत्री देखील सर्वपरिचीत आहे. रोहित शेट्टी वीरू देवगन यांना त्याचे वडील, गरू मानत होता. त्यांच्या आठवणीत त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

'वीरू देवगन यांनी त्यांच्या मुलांचे रुपांतर हिरोमध्ये केले आहे. अगदी वयाच्या १६ व्या वर्षापासून केलेला त्यांचा स्टंट हा वयाच्या ४५ व्या वर्षीही तेवढ्याच ताकदीचा असायचा. एकच अशी व्यक्ती आहे, जी स्वर्गातूनही माझ्यावर गर्व करतील. माझे गुरू, माझे वडील - वीरू देवगन', असे रोहितने त्याच्या इन्स्टापोस्टमध्ये लिहिले आहे.

Rohit Shetty Pays  a Heartwarming tribute to Veeru Devgan
रोहितने शेअर केलेली पोस्ट

'त्यांनी मला आयुष्यातले खूप मोठे आणि महत्वाचे धडे शिकवले आहेत. 'आपल्या कामाप्रती प्रामाणिक आणि प्रयत्नशील राहावे, कोणताही स्टंट करण्यापूर्वी आपली सुरक्षा सर्वात आधी महत्वाची आहे', हे त्यांनी मला शिकवले आहे', असेही रोहितने या पोस्टमध्ये लिहिले आहे.

सध्या रोहित शेट्टी त्याच्या 'सूर्यवंशी' चित्रपटाच्या शूटिंगसाठी बँकॉक येथे आहे. चित्रीकरण्यादरम्यानचा एक स्टंट व्हिडिओ देखील त्याने शेअर केला आहे. यामध्ये तो बाईकवरुन स्टंट करताना दिसतोय. त्याने या पोस्टसोबतच चाहत्यांना हा स्टंट घरी न करण्याचे आवाहन केले आहे. प्रशिक्षकांच्या सोबतीने आणि योग्य वातावरणात हा स्टंट करण्यात आला आहे. हा घरी करू नये, असे त्याने म्हटले आहे.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.