मुंबई - दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांचे ३० एप्रिलला निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबियांनी तेरवीच्या निमित्ताने घरी पूजा केली. शोकाकूल वातावरणात कुटुंबिय आणि नातेवाईक, मित्र परिवाराने त्यांना श्रध्दांजली वाहिली.
ऋषी कपूर यांची मुलगी रिध्दीमा हिने तेरवीचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यावेळी उपस्थितीत सर्वांनी रणबीर, रिध्दिमा यांचे सांत्वन केले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
यातील एका फोटोमध्ये ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर कपूर पूजा करीत असताना दिसत आहे.
''तुमचा वारसा आम्ही पुढे नेऊ...आम्ही तुमच्यावर प्रेम करतो'', असे रिध्दिमाने फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दुसऱ्या एका फोटोमध्ये रिध्दिमा ऋषी कपूर यांच्या प्रतिमेच्या बाजूला उभी असल्याचे दिसत आहे.
ऋषी कपूर यांचे निधन झाले तेव्हा रिध्दिमा दिल्लीमध्ये होती. लॉकडाऊन असल्यामुळे अंत्यविधीला ती पोहोचू शकली नव्हती. १४०० किलोमिटरचा प्रवास तिने गाडीने करीत मुंबई गाठली होती. तिच्यासोबत तिचा पती भारत सहानी आणि समारा ही मुलगी होती. यांनीही या प्रवासात तिला साथ दिली होती.
ऋषी कपूर यांच्या या तेरवी कार्यक्रमाला रणबीरची बेस्ट फ्रेंड आलिया भट्ट, करिश्मा कपूर, अरमान जैन आणि अदार जैन, श्वेता आणि नव्या नंदा आणि रणधीर कपूर उपस्थित होते.