मुंबई - बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली येथील एका रुग्णालयात त्यांना भरती करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती मिळताच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट दोघेही दिल्लीला रवाना झाले आहेत.
ऋषी यांना नेमक्या कोणत्या आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, याची कोणतीही माहिती समोर आली नाही. त्यांच्या प्रकृती खराब झाल्याने ते अरमान जैनच्या मेहंदी सेरेमनीसाठीही हजेरी लावू शकले नाही.
हेही वाचा -सारा-कार्तिकचे चाहत्यांसाठी नवे चॅलेंज, व्हायरल होतोय व्हिडिओ
ऋषी कपूर हे काही महिन्यांपूर्वीच न्यूयॉर्क येथून उपचार घेऊन भारतात परतले आहेत. त्यांना कॅन्सरचे निदान झाले होते. जवळपास एक वर्ष त्यांच्यावर उपचार सुरू होते. कॅन्सरशी यशस्वी झुंज देऊन ते परत कामावरही परतले होते.
अलिकडेच त्यांनी दीपिका पदुकोणसोबत 'इंटर्न' चित्रपटाची घोषणा केली. हा चित्रपट हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे.
हेही वाचा -'दबंग गर्ल'ची डिजीटल विश्वात एन्ट्री, गुन्हेगारीवर आधारित वेबसीरिजमध्ये साकारणार भूमिका