सध्या देशभरात देशभक्तीपर भावनिक वातावरण दिसून येतंय. चित्रपटांतूनही देशभक्तीला जोरदार पाठिंबा मिळताना दिसतोय. आता एक मराठी चित्रपट येतोय ज्याच्या नावातच देशभक्ती आहे ज्याचे नाव आहे ‘भारत माझा देश आहे’. एबीसी क्रिएशन प्रस्तुत, डॉ. आशिष अग्रवाल निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन पांडुरंग कृष्णा जाधव यांनी केले आहे. 'भारत माझा देश आहे' ची कथा पांडुरंग कृष्णा जाधव यांनीच लिहिली असून पटकथा, संवाद निशांत नाथाराम धापसे यांचे आहे.
मनाला स्तब्ध करणारा चित्रपट 'भारत माझा देश आहे समीर सामंत यांची गीते असलेल्या या चित्रपटाला अश्विन श्रीनिवास यांचे संगीत लाभले आहे. तर चित्रपटाचे संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला 'लाडू' म्हणजेच राजविरसिंह राजे गायकवाड आणि देवांशी सावंत या बालकलाकारांसोबत चित्रपटात मंगेश देसाई, शशांक शेंडे, छाया कदम, हेमांगी कवी, नम्रता साळोखे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
मनाला स्तब्ध करणारा चित्रपट 'भारत माझा देश आहे चित्रपटाचे दिग्दर्शन पांडुरंग कृष्णा जाधव म्हणतात, ''हा एक देशभक्तीपर चित्रपट असला तरी त्याची कथा वेगळी आहे. मनाला स्तब्ध करणारा हा चित्रपट आहे. अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करायची होती. कसलेले कलाकार असल्याने त्यांच्यासोबत काम करतानाही मजा आली. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट म्हणजे लहान मुलांसाठी पर्वणी आहे. प्रत्येक मुलाने पाहावा असा हा चित्रपट आहे.’’'अहिंसा परमो धर्म:' अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटात आता काय पाहायला मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. 'भारत माझा देश आहे' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली असून येत्या ६ मे रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - युक्रेनच्या मदतीला धावल्या गीता रबारी, लोकगीतातून जमवली २.२५ कोटींची मदत