मुंबई - शाहरुख खानच्या २०१६ मध्ये रिलीज झालेल्या फॅन चित्रपटामध्ये भूमिका केलेल्या शिखा मल्होत्राला महिन्याच्या सुरूवातीला अर्धांगवायूचा झटका आला होता. ती उपचारांना प्रतिसाद देत असली तरी ती पुन्हा पुर्वत चालू फिरु शकणार आहे याबद्दलची स्पष्टता नाही.
अभिनेत्री आणि नर्सिंगमध्ये पदवी धारक असलेली शिखा मुंबईच्या बाळासाहेब ठाकरे सीओव्हीआयडी रुग्णालयात नर्स म्हणून सेवा बजावत होती. १० डिसेंबर रोजी तिला अचानक अर्धांगवायूचा झटका आला आणि त्यानंतर तिला तातडीने कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले व त्यानंतर तिला मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तिच्या प्रकृतीविषयी बोलताना शिखाने एका अग्रगण्य दैनिकाला सांगितले की, "माझी तब्येत सुधारत आहे पण प्रक्रिया संथ आहे. मला खात्री आहे की मला पुन्हा कधीतरी चालता येईल."
अभिनेत्री शीखाने असेही म्हटले आहे की ती आपल्या शरीरावर असहाय्य आहे. पण मुख्य अभिनेत्री म्हणून तिचा पहिला चित्रपट असलेल्या 'कांचली'चा विचार करते तेव्हा तिचे मन आनंदित होते. शीखाने सांगितले की, या कठीण काळात तिला आपल्या प्रेक्षकांच्या पाठिंब्याची गरज आहे. शिखाने १२व्या वर्षीही अर्धांगवायू आला होता याचा खुलासा केला आहे. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून चाहत्यांच्या समर्थनाची अपेक्षा व्यक्त केली आहे.
हेही वाचा -'डॉक्टर जी'मध्ये झळकणार आयुष्यमान खुराणा, अनुराग कश्यपचे बहिण करणार दिग्दर्शन
'फॅन' चित्रपटा व्यतिरिक्त शिखाने शेवटच्या वेळी संजय मिश्रा दिग्दर्शित 'कांचली लाइफ इन ए स्लो' आणि 'रनिंग शादी' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.
हेही वाचा -‘द व्हाईट टायगर’मध्ये वर्गसंघर्षाचा थरार, ट्रेलर प्रदर्शित