मुंबई - 'बंगाली ब्युटी' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री बिपाशा बसू हिचा आज वाढदिवस आहे. बिपाशाने आपल्या हॉट आणि ग्लॅमरस भूमिकांनी पडद्यावर मोहिनी घातली होती. सध्या ती अभिनेता करण सिंग ग्रोवरसोबत आनंदाने आयुष्याचा आनंद घेत आहे. मात्र, एकेकाळी बॉलिवूडमध्ये बिपाशा आणि अभिनेता जॉन अब्राहमच्या रिलेशनशीपच्या चर्चा प्रचंड गाजल्या होत्या. ते दोघे ९ वर्ष एकमेकांना डेट करत होते. मात्र, अचानक त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि ते वेगळे झाले.
जॉन आणि बिपाशाच्या केमेस्ट्रीची झलक त्यांच्या 'जिस्म' चित्रपटात पाहायला मिळाली होती. प्रेक्षकांनाही ही जोडी चांगलीच पसंत पडली होती. या चित्रपटानंतरच त्यांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्यांच्या ब्रेकअपनंतर त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
हेही वाचा -'मलंग'च्या त्या 'किसींग सीन'बद्दल पाहा काय म्हणाला, आदित्य रॉय कपूर !!
मात्र, या ब्रेकअपमागचे नेमके कारण काय होते, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. तर, यामागे जॉनने केलेलं एक ट्विट होतं. २०१४ साली जॉनने केलेल्या एका ट्विटनंतर बिपाशा आणि जॉनच्या नात्याला पूर्णविराम लागला. या ट्विटमध्ये जॉनने सर्वांना नविन वर्षाच्या शुभेच्छा देत स्वत:च्या नावासोबत त्याच्या पत्नीच्या नावाचा उल्लेख केला होता.
-
Wishing you and your loved ones a blessed 2014! May this year bring you love, good fortune and joy. Love, John and Priya Abraham
— John Abraham (@TheJohnAbraham) January 2, 2014 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Wishing you and your loved ones a blessed 2014! May this year bring you love, good fortune and joy. Love, John and Priya Abraham
— John Abraham (@TheJohnAbraham) January 2, 2014Wishing you and your loved ones a blessed 2014! May this year bring you love, good fortune and joy. Love, John and Priya Abraham
— John Abraham (@TheJohnAbraham) January 2, 2014
हेही वाचा -अनन्या पांडेला सिध्दांतने दिलेला जवाब बनला नेटकऱ्यांच्या 'मिम्स'चा विषय
२०१० पासूनच जॉनची पत्नी प्रिया रुंचल आणि जॉनची ओळख होती. जॉनच्या या ट्विटनंतर बिपाशा पूर्णत: कोसळली होती. मात्र, तिने या ब्रेकअपमधून स्वत: ला सावरले. पुढे २०१६ साली एप्रिल महिन्यात तिने अभिनेता करण सिंग ग्रोवरसोबत लग्नगाठ बांधली. सध्या दोघेही आपल्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहेत.