मुंबई - यंदा लोकसभा निवडणूकांसाठी अनेक कलाकारांनी पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळत आहे. डान्सर आणि अभिनेत्री सपना चौधरी, उर्मिला मातोंडकर यानंतर आता भोजपूरी सुपरस्टार आणि भाजप नेता रवि किशन यांचे नावही समोर येत आहे. रवि किशन यांनी स्वतः आपण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे.
एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल माहिती दिली आहे. होय, मी लोकसभा निवडणूक लढवणार आहे, मात्र कोणत्या मतदारसंघातून हे पक्षच ठरवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. २०१७ मध्ये रवि किशन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. याआधी २०१४ मध्ये त्यांनी काँग्रेसकडून जौनपुरमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, यावेळी त्यांना केवळ ४ टक्के मतदान मिळाले होते.
Actor & BJP leader Ravi Kisan: I will contest in the upcoming Lok Sabha elections but the party will decide from where. pic.twitter.com/177DnXJnAQ
— ANI (@ANI) March 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Actor & BJP leader Ravi Kisan: I will contest in the upcoming Lok Sabha elections but the party will decide from where. pic.twitter.com/177DnXJnAQ
— ANI (@ANI) March 27, 2019Actor & BJP leader Ravi Kisan: I will contest in the upcoming Lok Sabha elections but the party will decide from where. pic.twitter.com/177DnXJnAQ
— ANI (@ANI) March 27, 2019
२०१७ मध्ये भाजप प्रवेशावेळी रवि किशन म्हणाले होते, की मी एका अशा पक्षात प्रवेश करत आहे जो गरीबांसाठी आणि सामान्यांसाठी काम करतो. आता रवि शंकर यांना कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.