ETV Bharat / sitara

रंपाट टीझर : सिने'माँ' चा दिवाना.. सोलापूरी मिथुनचा पाहा जलवा - teaser

रवी जाधव दिग्दर्शित रंपाट सिनेमाचा टीझर रिलीज झालाय...यात सोलापुरी मिथूनच्या भूमिकेत अभिनय बेर्डे झळकलाय...१७ मेला हा सिनेमा रिलीज होईल...

रंपाट सिनेमाचा टीझर रिलीज
author img

By

Published : Apr 5, 2019, 3:11 PM IST

मुंबई - नवनवे विषय हाताळणारा दिग्दर्शक अशी रवी जाधव यांची ख्याती आहे. याच परंपरेतला नवा सिनेमा आता येऊ घातलाय 'रंपाट'. लक्ष्मीकांत बेर्डेचा मुलगा अभिनय यात एका मिश्किल भूमिकेत झळकला आहे.

सिनेमा वेड्या मिथूनची भूमिका अभिनय करतोय. अभिनयाच्या वेडाने झपाटलेला मिथून त्याने प्रभावीपणे दाखवल्याचे टीझरमधून दिसते. दुसरे म्हणजे हा मिथून सोलापूरचा आहे. सोलापूर भाषेचा लहेजा इथे पाहायला मिळतो.

झी स्टुडिओची निर्मिती असलेल्या या सिनेमाची झलक ट्विटरवर पाहायला मिळते. या टीझरच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''सोलापूरहून आला है वह, कितना नया है यह!!! आजभी फेकलेलं पैक नही ऊठानेवाला, माँ का परवाना, सिने'माँ' चा दिवाना... मिथुन!!!!!''

रंपाट हा चित्रपट १७ मे २०१९ ला रिलीज होणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.