मुंबई - बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव नेहमीच काहीतरी वेगळी भूमिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतो. आपल्या चित्रपटातील भूमिकेइतकीच त्याच्या लूकचीही चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळते. वेगळ्या धाटणीच्या चित्रपटासाठी त्याची ओळख निर्माण झाली आहे. आता आगामी 'लुडो' चित्रपटात देखील त्याची आगळी वेगळी भूमिका पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे. मात्र, हा लूक पाहुन सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
अभिषेक बच्चनची मुख्य भूमिका असलेल्या 'लुडो' चित्रपटात राजकुमार एक महत्वपूर्ण भूमिका साकरत आहे. या भूमिकेसाठी त्याने महिलेचा लूक परिधान केला आहे. त्याने शेअर केलेला फोटो पाहुन त्याला ओळखता येणंही कठीण जात आहे. त्याच्या या फोटोवर नेटकऱ्यांच्या बऱ्याच प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काहींनी तर, त्याच्या लूकची थेट आलिया भट्टच्या लूकसोबत तुलना केली आहे. तर, काहींनी क्रिती सेनॉनसारखा लूक असल्याचेही म्हटले आहे.
- View this post on Instagram
Happy new year guys. #LUDO 🙏❤️@anuragbasuofficial @bhushankumar @tseries.official
">
हेही वाचा -'द बिग बुल'च्या पहिल्या पोस्टरमध्ये अभिषेक बच्चनचा खास लूक
राजकुमारने अतिशय अतरंगी मुलाच्या लूकमधील फोटो देखील पोस्ट केला आहे. त्याचे हे दोन्ही फोटो पाहुन चाहते देखील थक्क झाले आहेत.
अनुराग बासु या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. तर, राजकुमारसोबत अभिषेक बच्चन, आदित्य रॉय कपूर, पंकज त्रिपाठी, फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांचीही भूमिका यामध्ये पाहायला मिळणार आहे.
२४ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.