ETV Bharat / sitara

रजनीकांत यांना साकारायची 'ही' भूमिका, 'दरबार' ट्रेलर लॉन्च सोहळ्यादरम्यान व्यक्त केली इच्छा

author img

By

Published : Dec 17, 2019, 1:30 PM IST

'दरबार' चित्रपटाच्या निमित्ताने रजनीकांत तब्बल २५ वर्षानंतर पोलिसाच्या वर्दीत दिसणार आहेत. ट्रेलरमध्येही त्यांच्या भूमिकेची खास झलक पाहायला मिळते.

Rajinikanth wanted to play transgender role in film
रजनीकांत यांना साकारायची 'ही' भूमिका, 'दरबार' ट्रेलर लॉन्च सोहळ्यादरम्यान व्यक्त केली इच्छा

मुंबई - दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी 'दरबार' या चित्रपटाचा ट्रेलर अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. मुंबईमध्ये या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. दरम्यान रजनीकांत यांनी माध्यंमाशी संपर्क साधला. भविष्यात त्यांना कशाप्रकारची भूमिका साकारण्याची इच्छा आहे, हेदेखील त्यांनी यावेळी सांगितले.

रजनीकांत यांनी आत्तापर्यंत १६० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सिनेसृष्टीत त्यांनी ४५ वर्षांपेक्षा जास्त काम केले आहे. विविधांगी भूमिका साकारल्यानंतर आता त्यांना ट्रान्सजेंडर व्यक्तीची भूमिका साकारण्याची इच्छा आहे.

रजनीकांत

हेही वाचा -नववर्षात 'या' चित्रपटांची असणार सिनेमागृहात वर्दळ

यावर्षीच्या सुरुवातीलाच दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती यांनी 'सुपर डिलक्स' या चित्रपटामध्ये ट्रान्सजेंडर व्यक्तीची भूमिका साकारली होती. बॉलिवूडमध्येदेखील अक्षय कुमार 'लक्ष्मी बाँब' या चित्रपटात ट्रान्सजेंडर व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळेच आता असाच प्रयोग रजनीकांत यांना देखील आपल्या चित्रपटात करण्याची इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं

'दरबार' चित्रपटाच्या निमित्ताने रजनीकांत तब्बल २५ वर्षानंतर पोलिसाच्या वर्दीत दिसणार आहेत. ट्रेलरमध्येही त्यांच्या भूमिकेची खास झलक पाहायला मिळते. याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं, की त्यांनी पडद्यावर मस्ती, धमाल करता येणाऱ्या भूमिका साकारायला जास्त आवडतात. पोलीसाची भूमिका फार गंभीरपणे साकारावी लागते. त्यामुळे बऱ्याच वर्षानंतर पोलिसाच्या भूमिकेची निवड केली, असे ते म्हणाले.

हेही वाचा -प्रतीक्षा संपली.. रजनीकांत यांच्या 'दरबार'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

ट्रेलर लॉन्च सोहळ्यादरम्यान अभिनेता सुनील शेट्टीनेही हजेरी लावली होती. 'दरबार' चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रतिक बब्बर, कोरियोग्राफर संतोष सिवन, संगीतकार अनिरुद्ध रविचंदर, गायक अरमान मलिक यांचीही खास उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली.
१० जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. हिंदीसोबतच तेलुगू, तमिळ आणि मल्याळम या भाषांमध्ये हा चित्रपट पाहता येणार आहे.

या चित्रपटांशी असणार टक्कर -
१० जानेवारीलाच अजय देवगनचा तान्हाजी - द अनसंग वॉरिअर आणि दीपिका पदुकोणचा 'छपाक' हे दोन चित्रपट देखील प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे नववर्षाच्या सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर तगडी चुरस रंगताना दिसेल. या तीनही चित्रपटांबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे. त्यामुळे यापैकी आता तिकीटबारीवर कोणता चित्रपट 'बाजी' मारतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा -'आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं', 'तान्हाजी'चा दुसरा ट्रेलर प्रदर्शित

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.