ETV Bharat / sitara

राज कुंद्राने शिल्पा शेट्टीच्या नावावर केले 38 कोटीचे 5 फ्लॅट्स - राज कुंद्रा किनारा बंगला

कुंद्रा 'किनारा' या बंगल्यात कुटुंबासोबत राहतात. राज-शिल्पाचा हा बंगला मुंबईतील जुहू येथील गांधीराम रोडवर असून, पाच हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे. हा बंगला समुद्रकिनाऱ्यापासून 300 मीटर अंतरावर आहे.

राज शिल्पा
राज शिल्पा
author img

By

Published : Feb 4, 2022, 7:36 PM IST

मुंबई - प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra ) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राज यांनी पत्नी शिल्पा शेट्टीच्या नावावर ( Raj Kundra Transfer 5 Flats ) पाच फ्लॅट्स केले आहेत. या सर्व फ्लॅटची किंमत सुमारे 38.5 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. मालमत्तांच्या खरेदी-विक्रीची माहिती देणाऱ्या वेबसाईटने ही माहिती दिली.

कुंद्रा यांनी त्यांच्या 'किनारा' या बंगल्याचा पहिला मजला पत्नी शिल्पाच्या नावावर दिला असून त्यात 5 फ्लॅट्स आहेत. कुंद्रा 'किनारा' या बंगल्यात कुटुंबासोबत राहतात. राज-शिल्पाचा हा बंगला मुंबईतील जुहू येथील गांधीराम रोडवर असून, पाच हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे. हा बंगला समुद्रकिनाऱ्यापासून 300 मीटर अंतरावर आहे.

मुद्रांक शुल्क 1.9 कोटी रुपये

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिल्पा शेट्टीने फ्लॅट हस्तांतरणाच्या बदल्यात मुद्रांक शुल्क म्हणून 1.9 कोटी रुपये देखील भरले आहेत. हा व्यवहार 21 जानेवारी 2022 रोजीच झाल्याचे सांगण्यात येत आहे. या बातमीवर राज आणि शिल्पाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. गेल्या वर्षी राज कुंद्राला पोलिसांनी पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक केली होती. त्यावेळी राज दोन महिन्यानंतर जामिनावर बाहेर आले होते.

हेही वाचा - Ritesh Genelia Film : रितेश-जेनेलिया प्रेग्नंट !! 'मिस्टर ममी'चे पोस्टर रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.