ETV Bharat / sitara

‘राधे श्याम' चित्रपटातील 'आशिकी आ गई' गाण्यात प्रभास आणि पूजा हेगडेची आकर्षक केमिस्ट्री! - Aashiqui Aa Gayi Song Teaser

सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) 'राधे श्याम' (Radhe shyam) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. 2022 मधील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक असलेला हा चित्रपट प्रदर्शित होण्यास एक महिना बाकी आहे आणि चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चित्रपटातील प्रत्येक गोष्ट चर्चेचा विषय बनली असून चित्रपटातील पहिले हिंदी गाणे रिलीज झाले आहे.

Radhe Shyam
राधे श्याम'
author img

By

Published : Dec 2, 2021, 7:03 AM IST

मुंबई - ‘बाहुबली’ च्या प्रचंड यशानंतर प्रभासच्या (Prabhas) लोकप्रियतेत लक्षणीय वाढ झाली. आता त्याच्या प्रत्येक आगामी चित्रपटाची देशभरातील प्रेक्षक प्रतीक्षा करीत असतात. आता या सुपरस्टार प्रभासचा 'राधे श्याम' (Radhe shyam) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. 2022 मधील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक असलेला हा चित्रपट प्रदर्शित होण्यास एक महिना बाकी आहे आणि चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चित्रपटातील प्रत्येक गोष्ट चर्चेचा विषय बनली असून चित्रपटातील पहिले हिंदी गाणे रिलीज झाले आहे.

राधे श्यामच्या टीमने आपल्या सोशल मीडिया हँडलवर आगामी हिंदी गाणे 'आशिकी आ गई' (Aashiqui Aa Gayi) शेअर केले आहे. हे एक ड्रीम सिक्वेन्स गाणे असून दोघांचे, प्रभास आणि त्याची नायिका पूजा हेगडे (Pooja Hegde) याचे, पेहरावही रंगसंगतीमध्ये सारखेच दिसताहेत. या गाण्यात प्रभास पूजाच्या मॅचिंग आउटफिट्ससह एक ड्रीम सीक्वेन्सचा फील देण्यात आला असून प्रभास पूजाला बाइकवरून वेगवेगळ्या लोकेशन्सवर घेऊन जातो आहे. गाण्यात या दोन्ही कलाकारांमध्ये उत्कृष्ट केमिस्ट्रीची झलक दिसत आहे. पूजा हेगडे आणि प्रभासची जोडी प्रणयाराधन करताना बघून त्यावर चाहते कॉमेंट्सद्वारे आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

गाण्याचे पोस्टर आणि प्रोमो रिलीज झाल्यापासून चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अरिजित सिंगने गायलेल्या या गाण्याला मिथुनने संगीत दिले आहे. अनेक खास पोस्टर्सनंतर, आता हे स्पेशल हिंदी गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जे चाहत्यांना उत्साहित करेल आणि चित्रपटाची उत्कंठा वाढवेल.

राधेश्याम हा गुलशन कुमार आणि टी-सीरीज यांची प्रस्तुती असलेला, राधा कृष्ण कुमार यांनी दिग्दर्शित केलेला बहुभाषिक चित्रपट आहे. जो यूवी क्रियेशन्सद्वारे निर्मित आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केली आहे. ‘राधेश्याम’ हा चित्रपट १४ जानेवारी २०२२ रोजी चित्रपटगृहांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.